शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

ज्येष्ठांचा अनुभव कुटुंबास फायद्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:42 AM

ज्येष्ठ नागरिक हे देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी आपल्या तारुण्यात आपला वेळ, आपली मेहनत दिली म्हणून आज आपण हे सर्व बघत आहोत.

ठळक मुद्देमुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे शिबिर

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : ज्येष्ठ नागरिक हे देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी आपल्या तारुण्यात आपला वेळ, आपली मेहनत दिली म्हणून आज आपण हे सर्व बघत आहोत. मात्र ही गोष्ट आपण जाणीपूर्व विसरतो. आजचे ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांच्याकडे जर लक्ष दिले व त्यांना एकत्र येण्याची जास्तीत जास्त संधी दिली तर येणारी पिढी ही चांगली राहील. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव हा लहान मुलांसाठी योग्य नागरिक घडविण्यासाठी व कुटुंबाला फायद्याचा राहिल, असे प्रतिपादन मुख्य न्याय दंडाधिकारी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव बी.एम. पाटील यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने न्याय सेवा सदनात शनिवारी ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क’ याविषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष डी.एन. बर्लावार, सचिव डी.डी. सोनटक्के, पी.एल.व्ही. वर्षा मनवर, न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू.एम. खान व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.३०० लोकांची मेघे हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. परंतु गडचिरोली येथे जेनेरिक मेडिसीन उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत औषधी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. याप्रसंगी डी.डी. सोनटक्के यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपले गेलेले आयुष्य कसे होते, याचा विचार करण्यापेक्षा येणारे आयुष्य कसे चांगले जाईल, याचा विचार करावा व त्यासाठी संघर्ष करावा, असे प्रतिपादन केले. ज्येष्ठ नागरिक गेडाम यांनी स्त्रिया आणि पुरूष या दोघांनाही घर सांभाळणे आवश्यक आहे. काही गोष्टी परिवारासाठी करताना काही नियम तोडले गेले व परिस्थिती सांभाळता आली तर माणसाने परिवार सांभाळताना ते सुद्धा करावे, असे परखड मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन पीएलव्ही वैशाली बांबोळे तर आभार बी.व्ही. वाळके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.