केजीबीवींवर पावणेतीन कोटींचा खर्च

By Admin | Updated: May 4, 2015 01:35 IST2015-05-04T01:35:46+5:302015-05-04T01:35:46+5:30

पाच तालुकाच्या ठिकाणी असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील इयत्ता सहा ते दहावीपर्यंतच्या एकूण ७३६ विद्यार्थिनींच्या सोयीसुविधांवर ...

Expenditure on KGBVs is Rs | केजीबीवींवर पावणेतीन कोटींचा खर्च

केजीबीवींवर पावणेतीन कोटींचा खर्च

गडचिरोली : पाच तालुकाच्या ठिकाणी असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील इयत्ता सहा ते दहावीपर्यंतच्या एकूण ७३६ विद्यार्थिनींच्या सोयीसुविधांवर २०१४-१५ या वर्षात एकूण २ कोटी ८८ लाख ५० हजार रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती जि.प. शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी शाळाबाह्य, अपंग, निराधार व अनाथ विद्यार्थिनीसाठी शिक्षणाची सुविधा व्हावी या हेतूने शासनाच्या वतीने सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी व धानोरा या पाच तालुकास्थळी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू करण्यात आले आहे. सदर पाचही बालिका विद्यालय जि.प. शिक्षण विभागामार्फत चालविले जाते. पाचही बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींची प्रवेश क्षमता ७५० आहे. २०१४-१५ या वर्षात इयत्ता सहा ते दहावीपर्यंतच्या पाचही शाळा मिळून ७३६ विद्यार्थिनी दाखल झाल्या होत्या. या शाळातील विद्यार्थिनींना भोजन, निवास व्यवस्था आदींसह कपडे, पुस्तके व इतर दैनंदिन गरजांच्या वस्तूंचा पुरवठा शिक्षण विभागाच्या वतीने शाळांमध्ये करण्यात आला. पाचही शाळातील विद्यार्थिनी निवासी राहून चांगल्या दर्जाचे शिक्षण घेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Expenditure on KGBVs is Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.