कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

By Admin | Updated: November 13, 2015 01:33 IST2015-11-13T01:33:03+5:302015-11-13T01:33:03+5:30

कृषी ग्राहकांना मदत करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्याकडील वीज देयकाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने २०१४ मध्ये कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे.

Expansion of Agriculture Sanjivani Yojna | कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

१६ मार्चपर्यंत : हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
गडचिरोली : कृषी ग्राहकांना मदत करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्याकडील वीज देयकाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने २०१४ मध्ये कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेस राज्य शासनाने ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महावितरणचे राज्यभरात एकूण ४० लाख ३० हजार कृषी ग्राहक आहेत. यापैकी ३४ लाख १ हजार ग्राहक थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे ६ हजार १४० कोटी रूपयांची मूळ थकबाकी आहे. या योजनेनुसार शासनाला ५० टक्के रकमेपोटी ३० हजार ७० कोटी रूपये द्यावे लागणार आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत या योजनेचा ६ लाख ६७ हजार कृषी ग्राहकांनी लाभ घेतला. त्यांनी ३४९ कोटी ७ लाख रूपयांचा भरणा केला आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकी रकमेच्या ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यामध्ये भरता येणार आहे. महावितरणतर्फे थकित असलेले पूर्ण व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. सुरुवातीला ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ३१ आॅक्टोबर २०१४, ३१ मार्च २०१५ अशी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. आणखी एकदा मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलास मिळाला आहे.

Web Title: Expansion of Agriculture Sanjivani Yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.