महाेत्सवात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:35+5:302021-08-20T04:42:35+5:30
महाेत्सवाचे उद्घाटन जि.प. सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हाेते. यावेळी पं.स. ...

महाेत्सवात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन
महाेत्सवाचे उद्घाटन जि.प. सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हाेते. यावेळी पं.स. सभापती भास्कर तलांडे, तालुका कृषी अधिकारी कांबळे, उपसभापती लैजा चालूरकर उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या मुबलक आहेत. रानभाज्या विक्रीतूनही आर्थिक उन्नती साधता येते. महिलांनी रानभाज्यांची विक्री करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन करून शासकीय याेजनांचा लाभ घेऊन आर्थिक विकास साधावा, असे आवाहन केले. महोत्सवात पातूर, काटेरी भाजी, आघाडा, तरोटा, पनवेल भाजी, बांबू वासते, शेंगा, खापरखुटी, गूळवेल, रान लिंबू, हरतफरी, भुईआवळा यासह अन्य भाज्यांचे स्टाॅल लावण्यात आले, याशिवाय अनेक प्रकारचे कृषी अवजारे प्रदर्शनात ठेवण्यात आले हाेते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शेतकरी बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रशस्तिपत्र वितरित करण्यात आले.