लाॅकडाऊन काळातील शिक्षणाचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST2021-03-27T04:38:24+5:302021-03-27T04:38:24+5:30
प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका डाॅ. राणी बंग यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डाॅ. राणी बंग मॅडम यांनी कोविड काळात सुरू ...

लाॅकडाऊन काळातील शिक्षणाचे प्रदर्शन
प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेविका डाॅ. राणी बंग यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डाॅ. राणी बंग मॅडम यांनी कोविड काळात सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतूक केले. विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पा मारीत वैयक्तिक अनुभव शेअर केले. मी आजन्म विद्यार्थीच असून मलाही नवनवीन शिकायला आवडते. असे मत व्यक्त केले. यावेळी डायटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यानीही मार्गदर्शन केले. जि. प. शाळा महावाडा क्र. १ चा विद्यार्थी क्रिश दिवाकर कुमोटी याने माझ्या शाळेतील विद्यार्थी वाचनालयातील गोष्टीची पुस्तके व फुलोरा उपक्रमातील गोष्टींचे स्वाध्याय कार्ड वाचून कोकापम्हत्या या पद्धतीने सारांश लेखन करतात असे सांगितले. मुख्याध्यापक किशोर धाईत आणि आमचे मार्गदर्शक बापू मुनघाटे यांनी मेहनत घेतल्याचे सांगितले. त्रिवेणी हरिश्चंद्र राऊत, तिरूमल्ला हरिश्चंद्र मराठे याही विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. यावेळी विनित पद्मावार,संजय कोंकमुट्टीवार, संध्या चिलमवार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची रूपरेषा सिकेच्या प्रोग्राम लिडर वर्षा परचुरे, प्रास्ताविक उमा कोगेकर, निवेदन हर्षवर्धन डांगे यांनी सादर केले. आभार सिकेचे फेलो शिक्षक बापू मुनघाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मराठी डिस्ट्रिक्ट कोच संदीप पाटील, गणित डिस्ट्रिक्ट कोच योगेंद्र काटकर यांनी सहकार्य केले. हे प्रदर्शन फेसबुक व युट्युबवर काही दिवस उपलब्ध राहणार आहे.