कोठी येथे व्हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:13 IST2021-08-02T04:13:57+5:302021-08-02T04:13:57+5:30
भामरागड : भामरागड उपविभाग अंतर्गत काेठी पाेलीस मदत केंद्राच्या वतीने कोठी येथे हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील ...

कोठी येथे व्हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात
भामरागड : भामरागड उपविभाग अंतर्गत काेठी पाेलीस मदत केंद्राच्या वतीने कोठी येथे हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गाैरविण्यात आले.
पाेलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गावामधील युवकांनी नक्षल सप्ताहात सहभागी हाेऊ नये, पोलीस व जनता यांच्यातील संबंध सुधारून युवकांनी पोलीस दलाकडे आकर्षित व्हावे याकरिता कोठी येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोठी येथे हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी प्रभारी पाेलीस अधिकारी महेश घुगे, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास दुळे, झिंजुर्डे, सीआरपीएफचे पाेलीस निरीक्षक परविंदर हजर हाेत. त्यांनी पोमके हद्धीतील गावांना भेटी देऊन जनजागृती केली हाेती.
या स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला बक्षीस देऊन गौरवण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक कोठी संघाने पटकावला. प्रथम क्रमांकाच्या संघास रोख पारितोषिक, व्हॉलिबॉल व व्हॉलिबॉल नेट देण्यात आली. यावेळी पोलीस भरतीकरिता प्रोत्साहन देऊन सर्व युवकांना अल्पोपाहार व चहा व्यवस्था करण्यात आली होती. नवतरुणांमध्ये पोलीस दलाविषयी आपुलकीची भावना रुजविण्याचा नक्षल सप्ताहमध्ये प्रयत्न करण्यात आला.
010821\img-20210731-wa0042.jpg
व्हालीबाल खेळताना