जिल्ह्यात ठिकठिकाणी शिक्षक दिन उत्साहात

By Admin | Updated: September 6, 2015 01:16 IST2015-09-06T01:16:32+5:302015-09-06T01:16:32+5:30

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती जिल्ह्यात ठिकठिकाणी शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.

Excite teachers day in the district | जिल्ह्यात ठिकठिकाणी शिक्षक दिन उत्साहात

जिल्ह्यात ठिकठिकाणी शिक्षक दिन उत्साहात

गडचिरोली : भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती जिल्ह्यात ठिकठिकाणी शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. यावेळी कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, समीर केने, डॉ. राजेश चंदनपाट, डॉ. रोकडे, बाबाराव राठोड, डॉ. जे. व्ही. दडवे, डॉ. ईश्वर मोहुर्ले, कोहळे, मोहन रामटेके, दीपक जुनघरे, डॉ. गोविंदप्रसाद दुबे, किशोर आनंदवार, हेमंत बारसागडे उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवेगाव - मुख्याध्यापिका कुंभारे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर स्वयंशासन उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन निखील नानोटकर तर आभार रजनी सहारे यांनी मानले.
पारबताबाई विद्यालय, कोरची - शिक्षक दिन कार्यक्रमाला मुख्याध्यापक शालीक कराडे, भोवते, करंजेकर, हेमके, मडावी, चौधरी, भैसारे, गुरनुले, मडावी, खुणे उपस्थित होते. यावेळी स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला. यात उज्वला नंदेश्वर, पल्लवी वंजारी, माधुरी बोगा, लोमेश साखरे, ईमेल उईके, संजय नैताम यांनी सहभाग घेतला.
शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा, गडचिरोली - शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन उपक्रम घेण्यात आला. यावेळी चंदानी रायसिडाम, सौरव हलामी, प्राची पुराम, प्रतिक नैताम, शिवानी नरोटे यांनी सहभाग घेतला.
जि. प. प्राथमिक शाळा, वासाळा - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. के. लिंगायत होत्या. यावेळी प्रमोद सेलोकर, धनराज वैद्य, अविनाश वऱ्हाडे, वैशाली धाईत, सोनाली कापकर उपस्थित होते. संचालन सुजाता मेश्राम तर आभार सुमित मंडल यांनी मानले.
श्री किसनराव खोब्रागडे महिला विद्यालय, गडचिरोली - शिक्षक दिनी कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाठ, प्रा. एस. सुरपाम, सिद्धू मेश्राम व विद्यार्थीनी उपस्थित होते.
भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधीर भगत, प्रा. निकुडे, प्रा. कोमरे, प्रा. संदीप मैंद, प्रा. पत्तीवार, प्रा. दरेकार, प्रा. दुर्गे, डॉ. पाटील, प्रा. डांगे उपस्थित होते. प्रास्ताविक रिषभ दुर्गे, संचालन कानम सरकार तर आभार हिचामी यांनी मानले.
बाबुरावजी पा. भोयर कला महाविद्यालय, वडधा - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य नवघडे होते. उद्घाटन संस्थाध्यक्ष डॉ. दुर्वेश भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून फुकटे, भैसारे, प्रा. जनबंधू, पोटे, भोयर, पत्रे, भांडे, बांबोळकर, धानोरकर, म्हशाखेत्री, लोमेश राऊत, गंडाते, मुनघाटे, वट्टी उपस्थित होते. संचालन आकाश चापले, प्रास्ताविक प्रिया चिकराम तर आभार राणू लांजेवार हिने मानले.
अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा, वांगेपल्ली - शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन उपक्रम घेण्यात आला. यात रवींद्र सादमवार, रूपेश कोंडागुर्ले, दिलीप झाडे यांनी सहभाग घेतला. संचालन सादमवार तर आभार अजय चांदेकर यांनी मानले.
स्वामी विवेकानंद मतिमंद निवासी विद्यालय, चामोर्शी - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अयाज शेख होते. यावेळी आर. जी. झरकर, टी. एम. धोडरे उपस्थित होते. प्रास्ताविक बलवंत शेंडे, संचालन एम. एम. अंबाडकर तर आभार राजेंद्र गाजर्लावार यांनी मानले. यावेळी डी. जे. सरकार, उमेश सरकार, सदानंद गेडाम, शेषराज वासेकर, सुरभी गुडेपवार, शीमा खोब्रागडे यांनी सहकार्य केले.
कर्मवीर विद्यालय, अमिर्झा - कार्यक्रमाला प्राचार्य आर. डी. कंदुकवार, डी. डी. बेहरे, ए. जी. ओलख उपस्थित होते. संचालन रोशनी मसराम तर आभार साईराम वरगंटीवार यांनी मानले.
मोहसीनभाई जव्हेरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रेवतकर होते. यावेळी प्रा. नाजीम शेख, डॉ. कुषल लांजेवार उपस्थित होते. संचालन प्रा. हिवसे तर आभार म्हशाखेत्री यांनी मानले.
महात्मा गांधी कला, विज्ञान महाविद्यालय, आरमोरी - शिक्षक दिन कार्यक्रमाला किशोर ढवले, महेश उरकुडे, अंकुश गाढवे, प्रणाली गोंधोळे, मृणाली दोनाडाकर, शिल्पा जांभुळकर, बादलशहा मडावी, राहुल शिवरकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, प्रा. नोमेश मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विवेक भाजीपाले, संचालन अश्विनी लोणारे, स्वप्नील इष्टाम तर आभार गजेंद्र काळबांधे यांनी मानले. यावेळी अमिता बन्नोरे, डॉ. विजय रैवतकर, प्रा. सतेंद्र सोनटक्के उपस्थित होते.
कृषक हायस्कूल, चामोर्शी - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरविंद भांडेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून मोरेश्वर गडकर, लोमेश्वर पिपरे, अविनाश भांडेकर, गिरीश मुंजमकर, प्रकाश मठ्ठे, वर्षा लोहकरे, जासुंदा जनबंधू, दिलीप भांडेकर, लोमेश बुरांडे, अरूण दुधबावरे, दिलीप सहारे, मारोती दिकोंडवार, गणेश गव्हारे उपस्थित होते. यावेळी स्वयंशासन उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. संचालन संजय कुनघाडकर यांनी केले.
कौशल्यादेवी महिला महाविद्यालय, कोरची - कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश खोंडे, कापगते, जनबंधू, केरामी, अंबादे, लाडे, लिकेश अंबादे, हंसराज सहारे, स्वप्नील पेंदोर, ज्ञानेश्वर चौबे, सोनू चौबे, गौतम जमकातन उपस्थित होते. प्रियंका नैताम, संगोतीन पोरेटी, बिंधू भैसारे, मिथलेश घाटघुमर, रवीना हलामी यांनी सहकार्य केले.
लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल, जिमलगट्टा - शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन उपक्रम घेण्यात आला. यावेळी तनिष्क गज्जलवार व इतर १२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी मुख्याध्यापक सुरेश कुमरे उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
यशोधरा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तायवाडे होत्या. यावेळी स्वयंशासन उपक्रमात स्नेहल गव्हारे व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. दरम्यान पल्लवी कोटांगले, पल्लवी कावळे, ज्योत्स्ना नैताम यांना बक्षीस देण्यात आले. यशस्वीतेसाठी वालदे, भांडेकर, प्रवीण गव्हारे यांनी सहकार्य केले.
राजीव गांधी कला, विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज - कार्यक्रमाला संस्थेचे सचिव जेसा मोटवानी, नगरसेविका निलोफर शेख, धनराज मुंडले तर प्रभारी प्राचार्य निकोसे उपस्थित होते. संचालन डाकराम गायकवाड तर आभार भोजराज पुरी यांनी मानले.
कृषी महाविद्यालय, गडचिरोली - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. पी. लांबे होते. यावेळी पी. एस. नेहरकर, डॉ. जी. जे. भगत, डॉ. मोरे, डॉ. अलेक्झांडर, प्रा. कऱ्हाळे, राठोड, सरप, डॉ. काळपांडे, सरोदे, सातार उपस्थित होते. यावेळी लिकेश मार्गिया, भरत कोकोडे, रोहीत कोडापे, संगीता कुमरे, रक्षंदा मडावी यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान डॉ. लांबे, वैभव उईके यांचा सत्कार करण्यात आला. संचालन सायली मसराम तर आभार विजय भोयर यांनी मानले.
संजीवनी उच्च प्राथमिक शाळा, नवेगाव - कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सोनटक्के, सचिव पोरेड्डीवार, मुख्याध्यापक ठाकरे, श्रीकोंडावार, महल्ले उपस्थित होते. यावेळी स्वयंशासन उपक्रमात नीनाद कुळमेथे, जीवन आतलामी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान तन्मय श्रीकोंडावार, समिक्षा महल्ले, मयुरी नंदेश्वर, प्रीतम ताडाम, किरमीरवार, दडमल यांचा सत्कार करण्यात आला. संचालन पी. एस. एडलावार यांनी तर आभार आर. एस. शृंगारपवार यांनी मानले.
डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय, वायगाव - कार्यक्रमाला श्याम रामटेके, प्रभारी मुख्याध्यापक एम. बी. मडावी, एस. के. वाढई, गजभिये, मेश्राम, उराडे उपस्थित होते. संचालन कालिदास बन्सोड तर आभार एस. एम. कोचे यांनी मानले.
जि. प. शाळा, चेरपल्ली - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश दोंतुलवार होते. यावेळी मुख्याध्यापक सुधाकर घोसरे, डी. आर. रामटेके, डी. एस. वेलादी, व्ही. पी. लेकामी, एस. एन. गोरेकर उपस्थित होते. यावेळी स्वयंशासन उपक्रम घेण्यात आला.
जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा - कार्यक्रमाला मुख्याध्यापक अशोक वाढई, दिलीप धुर्वे, कस्तुरे, हजारे उपस्थित होते. स्वयंशासन उपक्रमात सुमित्रा उसेंडी, प्रफुल मातलामी, ज्ञानेश्वर पदा, अश्विनी पदा, करिष्मा कोवा, रूपाली गावळे, अंकुश किरंगे यांनी सहभाग घेतला.
श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय, आष्टी - कार्यक्रमाला प्रा. डॉ. एस. पी. सिंग, डॉ. पी. कश्यप, डॉ. अपर्णा मारगोनवार, डॉ. चव्हाण, पी. बी. गोहणे, मुरकुटे उपस्थित होते. संचालन नागापुरे यांनी केले.
जवाहरलाल नेहरू विद्यालय, जोगीसाखरा - कार्यक्रमाला श्रीकृष्ण खरकाटे, गिरीधरी रहेजा, इंद्रजीत डोके, संतोष हटवार, आतिश मेश्राम उपस्थित होते. संचालन माधुरी सरकार तर आभार सेझल गेडाम हिने मानले.
जि. प. शाळा, नवेगाव (रै.) - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बोधलकर होते. यावेळी ठवरे, कुंभारे, दुधबावरे, भैसारे, सावरबांधे, कांचनवार, उईके उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन सुश्रुशा सातुपते, संजीवनी जुआरे तर आभार हेमलता सातपुते यांनी मानले. यावेळी स्वयंशासन उपक्रम शाळेत घेण्यात आला. यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (लोकमत वृत्तसेवा)

Web Title: Excite teachers day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.