शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीच्या जिल्ह्यात चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक, दोन वाहनं जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:41 IST

एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली.

गडचिरोली : एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली.

सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने विक्रेत्यांकडून चोरट्या मार्गाने इतर जिल्ह्यातून दारूची आयात केली जात आहे. एका वाहनातून दारू येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पंचांसह खासगी वाहनाने शंकरपूर-मोहगाव मार्गावर पाळत ठेवली असता पहाटेच्या सुमारास एक रुग्णवाहिका (एमएच ३५-५२१५) येताना दिसली. संशय वाटल्याने त्या वाहनाला मोहगाव फाटा येथे अडवून झडती घेतली असता त्यात सुपर सॉनिक रॉकेट संत्रा या ब्रॅन्डच्या ९० मिलीच्या ५८ पेट्या (४८०० बाटल्या) आढळल्या. त्यांची किंमत १ लाख २४ हजार ८०० रुपये आहे. याशिवाय 2 लाख 50 हजार किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले.

याच दरम्यान केलेल्या दुसऱ्या कारवाईत विठ्ठलगाव-पोटेगाव मार्गावर एमएच ४०, ए १६३ ही कार संशयितपणे येताना आढळली. त्या वाहनाची विठ्ठलगावजवळ झडती घेतली असता त्यात सुपर सॉनिक रॉकेट संत्रा या ब्रॅन्डच्या ९० मिलीच्या ८ पेट्या (८०० बाटल्या) आढळल्या. त्यांची किंमत २० हजार ८०० आहे. शिवाय वाहन (किंमत ७० हजार ८००) जप्त करण्यात आली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक हारून शेख, सहायक दु.नि. जी.पी. गजभिये, एस.एम.गव्हारे, व्ही.पी.शेंदरे, व्ही.पी.महाकुलकर यांनी केली.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागGadchiroliगडचिरोलीliquor banदारूबंदीElectionनिवडणूक