अखेर रवी जंगलात वाघीण जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:35 IST2017-08-13T00:34:20+5:302017-08-13T00:35:58+5:30
देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील गावांमध्ये दहशत माजविणाºया वाघिणीला शार्पशुटर व वन विभागाच्या चमूने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ......

अखेर रवी जंगलात वाघीण जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज/आरमोरी : देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील गावांमध्ये दहशत माजविणाºया वाघिणीला शार्पशुटर व वन विभागाच्या चमूने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील रवी व अरसोडा दरम्यानच्या जंगल परिसरात जेरबंद केले. वाघिणीला पकडण्यात ताडोबा येथून आलेले शार्पशुटर व वन विभागाला यश मिळाले आहे. यामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा जंगल परिसरात तसेच देसाईगंज, कुरूड, कोंढाळा भागात गेल्या सहा महिन्यांपासून नागरिकांना वाघिणीचे दर्शन होत होते. रवी व अरसोडा गावात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. नागरिकांच्या मागणीनुसार दोन दिवसांपूर्वी वडसा वन विभागाने ताडोबा येथून शार्पशुटर बोलाविले. जवळपास ४२ लोकांच्या चमूने संयुक्तरित्या शोधमोहीम राबवून शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रवी-अरसोडा दरम्यानच्या जंगल परिसरात वाघीनीला पकडण्यात यश मिळविले.
वाघीनीला बेशुद्ध केल्यानंतर पिंजºयात बंद करून आरमोरीच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. सदर वाघीनीला नागपूर येथे पाठविण्याची तयारी वनाधिकारी करीत आहेत. वाघाला पकडण्यासाठी तीनदा शार्पशुटरची चमू बोलविण्यात आली. ज्या ठिकाणी शुक्रवारी वाघाने गायीला ठार केले होते, त्याच ठिकाणी वाघीणीला पकडण्यात आले.