रिमिक्स युगातही भजनाची गोडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:47+5:302021-09-19T04:37:47+5:30

शहरातील दुर्गा साई भजन मंडळासह अनेक मंडळाच्यावतीने गावात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत भजन गात सामाजिक समस्याची भजनाच्या माध्यमातून ...

Even in the era of remix, the sweetness of bhajan remains | रिमिक्स युगातही भजनाची गोडी कायम

रिमिक्स युगातही भजनाची गोडी कायम

शहरातील दुर्गा साई भजन मंडळासह अनेक मंडळाच्यावतीने गावात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत भजन गात सामाजिक समस्याची भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न चालविला आहे . भजनी मंडळात महिलांचासुद्धा सहभाग आहे. भजन मंडळ साधारणपणे जन्माष्टमी, कार्तिक, हनुमान जयंती, आषाढी एकादशी, काकड आरती तसेच गावातील गणपती, शारदा, दुर्गा आदी कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नामदेव, तुकाराम, एकनाथ, मुक्ताबाई या संतपरंपरेतील पौराणिक, आध्यात्मिक, यासह गण, गौळण आदीसह आरती भजन गाणाऱ्या मंडळींना मुखोद्गत असून तालासुरात गायलेल्या या भजनाच्या दिशेने नागरिक येऊन भजनाचा आस्वाद घेत असतात. साधारण महिनाभर आवडीने घराघरात भजन ठेवले जात असते मात्र भजनकरी कोणताही आळस न करता संगीतातून लोकांचे मनोरंजन तसेच प्रबोधन करीत हा वारसा जोपासत आहेत.

180921\img_20210918_151239.jpg

रिमिक्स युगात भजनाची गोळी कायम फोटो

Web Title: Even in the era of remix, the sweetness of bhajan remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.