विकास कामांचे मूल्यांकन
By Admin | Updated: March 20, 2015 01:23 IST2015-03-20T01:23:56+5:302015-03-20T01:23:56+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, ...

विकास कामांचे मूल्यांकन
चामोर्शी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शामराव कुंभार, जि. प. चे मुख्य लेखा तथा वित्त लेखाधिकारी राऊत यांनी चामोर्शी तालुक्यातील सन २०१० ते २०१३ या तीन वर्षांच्या कालावधीत झालेल्या विविध विकास कामांचे मूल्यांकन केले. तसेच मोका तपासणी करून कामांच्या दस्तावेजाचीही तपासणी केली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीस्तरावर चामोर्शी तालुक्यातील सन २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या तीन वर्षात मागास क्षेत्र अनुदान निधी, ग्रामीण विकास पायाभूत निधी (नाबार्ड), जिल्हा निधी व इतर योजनेच्या निधीतून कोट्यवधी रूपयांचे कामे मंजूर करण्यात आले. सदर काम अंतिम टप्प्यात असून अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तीन वर्षाच्या कार्यकाळात करण्यात आलेली कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण तसेच अंदाज पत्रकानुसार झाली आहेत काय, हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट कामाच्या ठिकाणी जाऊन विकास कामांची तपासणी केली.
यावेळी उपअभियंता मेश्राम, विस्तार अधिकारी मुद्देमवार, भोगे, तळोधी ग्रा. पं. चे ग्राम विकास अधिकारी देवानंद फुलझेले, पांडुरंग दुधबावरे, सुनील कुनघाडकर आदी उपस्थित होते. विकास कामांची तपासणी केल्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)