जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST2021-01-13T05:35:54+5:302021-01-13T05:35:54+5:30
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने ...

जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आराेग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली आहे.
पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी गडचिराेली येथे विश्रामगृहात ना. यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावर चर्चा केली. याप्रसंगी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष नंदू वाईलकर, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश रत्नावार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुर्वतकर, जिल्हा उपाध्यक्ष एनएसयुआय गौरव अलाम, जिल्हा महासचिव काँग्रेस अनिल कोठारे, एनएसयुआयचे महासचिव गौरव येनप्रेडीवार, मयुर गावतुरे, रुपेश गुजरकर, रोहित चंदावार, शरद भजभुजे, सोनू कोलते आदी उपस्थित हाेते.
निवेदनात म्हटले आहे की, भारतातील २५ मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती अतिशय गंभीर असून, जिल्ह्यात कुठलेही उद्योगधंदे उपलब्ध नाही. येथील जनता गोरगरीब असून त्यांना उपचारासाठी नागपूरला जावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, तसेच जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी केली आहे.