महामारीत हजाराे लाेकांचे पाेट भरले; अनुदानाअभावी शिवभाेजन केंद्रचालक उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:50+5:302021-06-29T04:24:50+5:30
गडचिराेली : लाॅकडाऊनच्या कालावधीत शिवभाेजन केंद्रांनी हजाराे नागरिकांच्या पाेटाची भूक शांत केली आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले ...

महामारीत हजाराे लाेकांचे पाेट भरले; अनुदानाअभावी शिवभाेजन केंद्रचालक उपाशी
गडचिराेली : लाॅकडाऊनच्या कालावधीत शिवभाेजन केंद्रांनी हजाराे नागरिकांच्या पाेटाची भूक शांत केली आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने शिवभाेजन केंद्र चालक अडचणीत आले आहेत.
शहरात आलेल्या नागरिकाला कमी खर्चात जेवणाची व्यवस्था व्हावी, यासाठी राज्य शासनाने शिवभाेजन केंद्र सुरू केले आहे. गडचिराेली जिल्ह्यात बाराही तालुक्यांमध्ये हे केंद्र सुरू आहेत. काेराेना काळात अगदी माेफत शिवभाेजन थाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत तालुकास्तरावर ११० व जिल्हास्तरावर ३०० शिवभाेजन थाळ्या अगदी माेफत दिल्या जात आहेत. यावर शासन संबंधित केंद्रचालकाला अनुदान देते. मात्र, मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांचे अनुदान थकले आहे, तसेच जून महिनासुद्धा आता संपण्याच्या मार्गावर आहे. दर महिन्याचा जेवणाचा खर्च लाखाे रुपयांचा आहे. मात्र, अनुदान मिळाले नसल्याने हा लाखाे रुपयांचा खर्च कसा करावा, असा प्रश्न केंद्रचालक बचत गटांसमाेर निर्माण झाला आहे. आणखी काही दिवस अनुदान मिळाले नाही तर केंद्र चालविणे कठीण हाेईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाभरातील केंद्रचालकांनी दिली आहे.
बाॅक्स ....
प्रती थाळी ५० रुपये अनुदान
गडचिराेली शहरात एकच केंद्र आहे. या केंद्राला सद्य:स्थितीत प्रति दिवस ३०० थाळी एवढ्या शिवभाेजन वितरणाची मर्यादा दिली आहे. १० रुपयात शिवभाेजन द्यायचे आहे. मात्र, सध्या काेराेनामुळे माेफत शिवभाेजन दिले जात आहे. शासन प्रत्येक थाळीवर केंद्र चालविणाऱ्या बचत गटाला ५० रुपयांचे अनुदान देते. भाजीपाला, किराणा, मजुरांची मजुरी, खाेलीचा भाडे या बाबींवरील खर्च लक्षात घेतला तर प्रती थाळी अनुदान वाढविण्याची गरज आहे.
बाॅक्स ......
अनुदान रखडले; थाळी संख्या घटली
- गडचिराेली शहरात एकच केंद्र आहे. या केंद्राला दरदिवशी केवळ २०० थाळी वितरणाची मर्यादा दिली आहे. गडचिराेली हे जिल्हास्थळ असल्याने ग्रामीण भागातील अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे थाळींची संख्या वाढवून देण्याची गरज आहे.
- सध्या काेराेनामुळे गडचिराेली शहरातील केंद्राला २०० ऐवजी ३०० थाळी वितरणाची मर्यादा दिली आहे. मात्र, एवढ्या थाळी २ वाजताच संपतात. २०० थाळी तर १२ वाजताच संपण्याची शक्यता आहे.
- तीन महिन्यांपासून अनुदान रखडल्याने केंद्रचालक अडचणीत आले आहेत. शासनाने केंद्र चालविणाऱ्या बचत गटांना अनुदान देण्याची गरज आहे.
बाॅक्स .....
काेट ...
केंद्र चालविणे झाले कठीण
दर दिवशीचा भाजीपाला, किराणा, मजुरांची मजुरी, गॅस, घरभाडे यावर महिन्याला लाखाे रुपये खर्च हाेतात. पूर्वी प्रत्येक नागरिकाकडून १० रुपये घेण्याची परवानगी हाेती. त्यामुळे थाेडेफार पैसे गाेळा हाेत हाेते. आता मात्र शासनाच्या आदेशानुसार माेफत जेवण उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यामुळे एकही पैसा मिळत नाही. अशातच अनुदान मिळत नसल्याने केंद्र चालविणे कठीण झाले आहे. - उमा बन्साेड, शिवभाेजन केंद्रचालक, गडचिराेली.
बाॅक्स ...
काेट.....
शिवभाेजन केंद्रावरील थाळ्या व वेळ वाढविण्याची गरज
गडचिराेली येथील शिवभाेजन केंद्रावरील जेवण चांगले राहते, तसेच बाजूला टेबल, खुर्च्या ठेवल्या आहेत. यावर बसून आरामदायीपणे जेवण करता येते. शासनाच्या आदेशानुसार केंद्र सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहते. मात्र, बऱ्याचवेळा थाळींची मर्यादा संपल्याने जेवण मिळत नाही. शासनाने थाळींची संख्या वाढवून देण्याची गरज आहे. - संजय कुसनाके, लाभार्थी.
काेट ......
गडचिराेलीचे शिवभाेजन केंद्र मुख्य चाैकात आहे. येथून जिल्हा रुग्णालय तीन किमी अंतरावर आहे. जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील अनेक रुग्ण भरती राहतात. त्यांच्या नातेवाइकांना जेवणाची गरज राहते. मात्र, या परिसरात शिवभाेजन केंद्र नाही, तसेच सायंकाळीसुद्धा जेवणाची गरज राहत असल्याने रात्री ८ वाजेपर्यंत शिवभाेजन केंद्र सुरू असणे गरजेचे आहे. - प्रशांत उंदीरवाडे, लाभार्थी.