जीवनाचा नैसर्गिक आनंद घ्या
By Admin | Updated: November 27, 2015 01:45 IST2015-11-27T01:45:43+5:302015-11-27T01:45:43+5:30
विविध जाती, धर्माचे उत्सव साजरे केले जातात. या उत्सवादरम्यान सामाजिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.

जीवनाचा नैसर्गिक आनंद घ्या
सुभाषचंद्र उईके : रामनगरात राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव
गडचिरोली : विविध जाती, धर्माचे उत्सव साजरे केले जातात. या उत्सवादरम्यान सामाजिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. याची जाणीव ठेऊन सामुदायिक प्रार्थनेतून सर्वांनी परमार्थमय व्यवहार बाळगुण कायद्याच्या चौकटीत राहून सामाजिक जीवनाचा नैसर्गिक आनंद घ्यावा, असे प्रतिपादन अॅड. सुभाषचंद्र उईके यांनी केले.
रामनगरात आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात तिसऱ्या दिवशी बुधवारी ते बोलत होते. कार्यक्रमात प्रचारक केवळराम शेंदरे यांनी आडकोजी महाराजांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. रात्री परशुराम उईके यांचे कीर्तन झाले. यावेळी डॉ. शिवनाथ कुंभारे, रमेश भुरसे, सुरेश मांडवगडे, कवडू येरमे, सुखदेव वेठे, गजानन राऊत, सुरेश भोयर, बापूजी गेडाम, प्रवीण मुक्तावरम, चंद्रभान गेडाम, अशोक चिलबुले, बाबा नक्षिणे, अर्चना नक्षिणे, राजेंद्र भरडकर, लक्ष्मण आलाम, मनोज पवार, नानाजी वाढई, देवेंद्र हिवसे, राजेंद्र भरडकर, सुषमा राऊत, मंदा मांडवगडे, शोभा कुंभारे उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान संत आडकोजी महाराज व गुरूनानक देव यांची जयंती साजरी करण्यात आली.