नक्षल्यांमुळे विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:42 IST2017-08-09T00:41:57+5:302017-08-09T00:42:37+5:30
दुर्गम भागातील गावांचा विकास झाल्यास गावातील नागरिक नक्षल्यांना गावात पाय ठेवू देणार नाही.

नक्षल्यांमुळे विकास रखडला
लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : दुर्गम भागातील गावांचा विकास झाल्यास गावातील नागरिक नक्षल्यांना गावात पाय ठेवू देणार नाही. याची पक्की जाणीव नक्षल्यांना असल्याने ते विकासकामांना विरोध करीत आहेत. त्यामुळेच दुर्गम भागातील गावे व नागरिकांचा विकास रखडला आहे. नक्षल्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गावित यांनी केले.
लाहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत ७ आॅगस्ट रोजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याप्रसंगी एसडीपीओ गावित बोलत होते. अध्यक्षस्थानी गजानन पडळकर होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भामरागडचे नवीन एसडीपीओ तानाजी बरडे, साळवे, सीआरपीएफचे सौरभ, सरपंच सिंडा बोगामी, नेवडा बोगामी, रमेश गोटा, बाबुराव पिपरे, मोतीराम घोसरे, राजू तिम्मा आदीबाबत उपस्थित होते. व्हॉलिबॉल व क्रिकेटचे साहित्य वितरित करण्यात आले. संचालन व आभार निमसरकार यांनी मनले.