शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

गडचिरोली लोकसभा निवडणूक निकाल २०१९; अशोक नेतेंनी घेतली ८ हजारांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:06 AM

Gadchiroli Lok Sabha Election Results 2019; लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत भाजपचे नेते अशोक नेते यांनी ८ हजार मतांहून अधिकची आघाडी घेतल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी हे नेते यांच्यासमोरचे आव्हान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत भाजपचे नेते अशोक नेते यांनी ८ हजार मतांहून अधिकची आघाडी घेतल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी हे नेते यांच्यासमोरचे आव्हान आहे.या निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार आहेत. भाजपचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे हे पाच उमेदवार उभे आहेत. मात्र खरी लढत भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये आहे. गेल्यावेळीही याच दोन उमेदवारांमध्ये लढत होऊन नेते यांनी एकतर्फी विजय मिळविला होता. यावेळी ही लढत अटीतटीची असल्याचे वातावरण आहे.तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुका ते छत्तीसगड सीमेवरील सालेकसा तालुक्यापर्यंत ५०० कि.मी. पेक्षा जास्त लांब असलेल्या गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव लोकसभा मतदारसंघात यावेळी दुहेरी लढत होती. विद्यमान खासदार असलेले भाजपचे अशोक नेते आणि गेल्यावेळी पराभूत झालेले काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. गेल्यावेळी नेते यांनी तब्बल २ लाख ३६ हजार मतांच्या फरकाने बाजी मारली होती.नक्षलवाद, बेरोजगारी, उद्योगधंद्यांचा अभाव, मागासलेपण हे या मतदारसंघातील परंपरागत मुद्दे आजही कायम आहेत. या मतदारसंघाने आलटून पालटून अनेक लोकप्रतिनिधी पाहिले. पण या परंपरागत मुद्यांमध्ये फारसा बदल झालेला दिसला नाही. त्यामुळे ही परिस्थिती बदलवण्याचे स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठिशी मतदार उभा राहील असे चित्र या मतदारसंघात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालgadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर