शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याची मालमत्ता कोटींवर

By admin | Updated: June 11, 2015 01:43 IST

आरमोरी पंचायत समितीत शाखा अभियंता (वर्ग-३) या पदावर कार्यरत असलेले मनोज झेंबाजी मोटघरे याला ५० हजार रूपयांची लाच घेताना गडचिरोली येथील....

धाडसत्र : नागपूर, आरमोरीतील घराची झडती
गडचिरोली : आरमोरी पंचायत समितीत शाखा अभियंता (वर्ग-३) या पदावर कार्यरत असलेले मनोज झेंबाजी मोटघरे याला ५० हजार रूपयांची लाच घेताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अटक केली होती. त्यानंतर लगेच त्याच्या नागपूर व आरमोरी येथील घराची झडती घेण्यात आली. या झडतीत त्याच्याकडे १ कोटी १ लाख १५ हजार ३७० रूपयांची मालमत्ता असल्याचे एसीबीला आढळून आले आहे.
आरमोरी तालुक्यातील वडधा ग्राम पंचायतमध्ये मनेरगांतर्गत १ लाख ८७ हजार ८८४ रूपयांच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासोबतच एमबी रजिस्टर तयार करण्याकरिता शाखा अभियंता मनोज मोटघरे याने ५० हजार रूपयांची लाच घेतली होती. त्याच्या विरूद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्या नागपूर व आरमोरी येथील घराची झडती घेतली.
नागपूर येथील घर झडतीदरम्यान त्याच्या घरी तीन लाख २५ हजार रूपये रोख, १२० ग्रॅम सोने, मिहान भागात आठ लाख रूपये किमतीचा प्लॉट, बँकेतील शिल्लक ९५ हजार ४३८ व घरगुती साहित्य असे मिळून २४ लाख १८ हजार ४४० रूपयांची मालमत्ता मिळून आली.
आरमोरी येथील घर झडतीमध्ये १७ लाख २२ हजार ८३० रूपये रोख, नागपूर येथील प्लॅटची किंमत पाच लाख ५० हजार ९१८, आरमोरी व इतर ठिकाणी असलेले सात प्लॉट किंमत नऊ लाख १९ हजार, पत्नी व त्यांच्या नावे असलेल्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम २२ लाख सहा हजार १८६, आरमोरी येथील घराची किंमत आठ लाख एक हजार, धानोरा येथील घराची किंमत ३५ हजार, फिगो कंपनीचे चारचाकी वाहन सात लाख दोन हजार, मोटारसायकल किंमत ६० हजार, दोन मुदतठेवी सात लाख, असे एकूण ७६ लाख ९६ हजार ९३० रूपयांची मालमत्ता आणि १० ग्रॅम सोने मिळून आले आहे.
दोन्ही ठिकाणी घेण्यात आलेल्या घर झडतीमध्ये २४ लाख १८ हजार ४४० रूपये व ७६ लाख ९६ हजार ९३० रूपये असे एकूण एक कोटी एक लाख १५ हजार ३७० रूपयांचे रोख व मालमत्ता एसीबीला आढळून आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)
१२ पर्यंत पोलीस कोठडी
लाचखोर शाखा अभियंता मनोज मोटघरे याला बुधवारी गडचिरोली येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.