कुरखेडा मार्गावरील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:23 IST2018-02-15T01:22:48+5:302018-02-15T01:23:03+5:30

शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कुरखेडा मार्गावरील पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या प्रवेशद्वारासमोर काही नागरिकांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते.

Encroachment took place on the Kurkheda road | कुरखेडा मार्गावरील अतिक्रमण काढले

कुरखेडा मार्गावरील अतिक्रमण काढले

ठळक मुद्देवनविभागाची कारवाई : रात्रीतून तयार केलेले झोपडीवजा घर पाडले

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कुरखेडा मार्गावरील पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या प्रवेशद्वारासमोर काही नागरिकांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते. याबाबत ठोस निर्णय घेत वनविभागाने येथील अतिक्रमण महसूल व पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून बुधवारी काढले.
कुरखेडा मार्गावर असलेल्या पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या संरक्षण भिंतीलगत काही नागरिकांनी अतिक्रमण केले. तसेच काही अतिक्रमणधारकांनी रात्रीतून झोपडीवजा घर तयार केले. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना मिळाली. देसाईगंजचे वनपरिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेकर यांच्या नेतृत्वात महसूल मंडळ अधिकारी व पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीत कुरखेडा मार्गावरील सदर अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी बांधण्यात आलेले झोपडीवजा घर पाडण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या भागात वनविभागाची मोकळी जागा असल्यामुळे अतिक्रमण करण्यासाठी अनेक नागरिक सरसावतात. अतिक्रमण करणे ही नागरिकांची नित्याची बाब झाली आहे.
अशाच प्रकारचे अतिक्रमण सिरोंचा, आलापल्ली तसेच गडचिरोली वन विभागात अनेक ठिकाणी झाले आहे. मात्र याकडे स्थानिक वनाधिकाºयांचा कानाडोळा होत आहे.
 

Web Title: Encroachment took place on the Kurkheda road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.