भूखंड माफियांच्या इशारावरून झोपडीचे अतिक्रमण हटविले

By Admin | Updated: September 16, 2014 23:43 IST2014-09-16T23:43:33+5:302014-09-16T23:43:33+5:30

१९७८-१९७९ पासून अतिक्रमणीत झोपडी व वहिवाटीतील सरकारी जमिनीवर दाखल आर नुसार असलेल्या जागेवरील आपली झोपडी महसूल व पोलीस प्रशासनाने शिक्षण संस्थाचालक व शहरातील

The encroachment of the hut has been removed from the plots mafia warnings | भूखंड माफियांच्या इशारावरून झोपडीचे अतिक्रमण हटविले

भूखंड माफियांच्या इशारावरून झोपडीचे अतिक्रमण हटविले

गडचिरोली : १९७८-१९७९ पासून अतिक्रमणीत झोपडी व वहिवाटीतील सरकारी जमिनीवर दाखल आर नुसार असलेल्या जागेवरील आपली झोपडी महसूल व पोलीस प्रशासनाने शिक्षण संस्थाचालक व शहरातील काही भूमाफिया राजकारण्यांच्या संगणमताने हटविल्याचा आरोप डाकराम भास्कर कांबळे यांनी केला आहे.
डाकराम भास्कर कांबळे यांनी म्हटले आहे की, दिवंगत भास्कर लालाजी कांबळे यांच्या पत्नी अनसूया व मुलगा तसेच विधवा महिला रेखा यांचे सन १९७८-१९७९ पासून अतिक्रमणीत जागेवर झोपडी होती. वहिवाटीतील सरकारी जमिनीवर दाखल आर मध्ये या झोपडीची नोंदही आहे. सदर जमिनीचा पट्टा मिळण्याकरीता व नियमानुकल करण्याकरीता अर्ज केलेला आहे. शासकीय नियमाप्रमाणे दंड व जमिनीच्या नियमानुसार किंमत अतिक्रमणधारक भरण्यास तयार असताना व ही जमिनी राखीव नसताना महसूल व पोलीस प्रशासनाने बळजबरी करून संस्थाचालक व काही राजकीय भूमाफियांच्या इशारावर सदर अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे आपला परिवार पूर्णपणे उघड्यावर आला आहे. अतिक्रमण काढण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना नोटीस देण्यात आलेली नाही. पोलिसांच्या मदतीने बळजबरीने झोपडी तोडण्यात आली. तसेच अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे वृध्द अनुसया कांबळे यांना चक्कर येऊन जमिनीवरच कोसळल्या. त्यांना शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण धनाढ्यांच्या इशारावर काढणाऱ्या पोलीस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा डाकराम कांबळे यांनी दिला आहे. या जागेचा घरपट्टीकरही ग्रामपंचायत आरमोरीकडे आपण गेल्या अनेक वर्षांपासून भरत आहो. ग्रामपंचायत आरमोरीने या झोपडी वजा घराला घर क्रमांकही दिलेला आहे. तसेच महसूल प्रशासनाच्या दप्तरी या जागेची नोंदही भास्कर कांबळे या आपल्या वडीलाच्या नावाने नोंद आहे, असे असताना शिक्षण संस्थानीक व काही भूखंड माफीया यांच्या दबावात ही कारवाई करण्यात आली आहे, असेही कांबळे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The encroachment of the hut has been removed from the plots mafia warnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.