अतिक्रमणधारक तहसीलवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:44+5:302021-06-19T04:24:44+5:30
तहसीलदार एच. एस. सय्यद यांना निवेदन देऊन अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे मिळवून देण्याची मागणी केली. सिरोंचा नगरपंचायत अंतर्गत मागील २० ...

अतिक्रमणधारक तहसीलवर धडकले
तहसीलदार एच. एस. सय्यद यांना निवेदन देऊन अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे मिळवून देण्याची मागणी केली. सिरोंचा नगरपंचायत अंतर्गत मागील २० ते ३० वर्षांपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधून निवास करत आहेत व गृहकर भरत आहेत अशा सर्व अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण करून पट्टे मिळवून देण्यात यावे, तालुक्यातील इतर अनेक गावांत वनजमिनीवर झालेले अतिक्रमणाचेही वनविभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येऊन त्यांनाही पट्टे देण्याची मागणी करण्यात आली. जनतेच्या मागणीनुसार पाॅवर हाऊस, पाणी पंप हाऊस, नाला व ढीवर समाज मातामंदिराची सीमा निश्चित करावी व बौद्ध समाजाच्या परिवर्तन भवनाला हात लावू नये या संबंधात सकारात्मक विचार करून प्रशासनाने योग्य पावले उचलावी, असे निवेदनात म्हटले आहे.