अतिक्रमणधारकांची नगर पंचायतीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:29+5:30
शहरात वडसा-कुरखेडा या प्रमूख मार्गावर हातठेल्यावर दुकाने थाटण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने नुकतीच येथील अतिक्रमण काढत रस्ता मोकळा केला. येथील बाजार वाडीतील अतिक्रमण विरोधात सुद्धा मोहीम सुरू करण्यात आल्याने येथे अनेक वर्षापासून लहान सहान व्यवसाय थाटत उदरनिर्वाह करणाऱ्यासमोर संकट निर्माण झाला आहे.

अतिक्रमणधारकांची नगर पंचायतीवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने मुख्य मार्गासह बाजारवाडीतील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू केली. ही कारवाई थांबविण्याच्या मागणीसाठी येथील व्यावसायिकांनी जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात बुधवारी नगर पंचायत कार्यालयावर धडक दिली.
शहरात वडसा-कुरखेडा या प्रमूख मार्गावर हातठेल्यावर दुकाने थाटण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने नुकतीच येथील अतिक्रमण काढत रस्ता मोकळा केला. येथील बाजार वाडीतील अतिक्रमण विरोधात सुद्धा मोहीम सुरू करण्यात आल्याने येथे अनेक वर्षापासून लहान सहान व्यवसाय थाटत उदरनिर्वाह करणाऱ्यासमोर संकट निर्माण झाला आहे. वास्तविक बाजारवाडीतील अतिक्रमणामुळे वाहतुकीला कोणताच अडथडा नाही. त्यामुळे गरीबांचा रोजगार हिरावणार अशी कार्यवाही नगरपंचायत ने करू नये, अशी मागणी सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात व्यावसायिकांनी केली.
यावेळी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, मुख्याधिकारी नमीता बांगर, सभापती सोनू भट्टड, नगरसेवक पुंडलिक देशमुख, मनोज सिडाम उपस्थित होते. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडून मार्गदर्शन घेत पुढील कार्यवाही करण्याचे व ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबविणार असल्याचे मुख्याधिकारी नमीता बांगर यांनी सांगीतले. यावेळी सुरक्षित वाहतूक होण्यासाठी पाऊले उचलल्याचे त्या म्हणाल्या.