शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

उच्च शिक्षणासाठी मुलांना प्रेरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:21 AM

केवळ नोकरी मिळविणे एवढेच शिक्षणाचे महत्त्व नाही तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पालकांनी दिशादर्शकाची भूमिका पार पाडावी.

ठळक मुद्देठाणेदारांचे आवाहन : मोहगाव येथे जनजागरण मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : केवळ नोकरी मिळविणे एवढेच शिक्षणाचे महत्त्व नाही तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पालकांनी दिशादर्शकाची भूमिका पार पाडावी. आपल्या पाल्यांना वाम मार्गाने जाऊ न देता त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी दिले.कुरखेडा पोलीस ठाण्याच्या वतीने अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग असलेल्या मोहगाव (मेंढा) येथे गुरूवारी आयोजित जनजागरण मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जनजागरण मेळाव्याचे उद्घाटन सोनेरांगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सोड यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून तंमुस अध्यक्ष हरबाजी शेंडे, माजी सरपंच जगन मडावी, कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. तोडुलवार, डॉ. चुनारकर, डॉ. वट्टी, डॉ. हलामी, ग्रा.पं. सदस्य माधव दहिकर, वर्षा राऊत, रामदास हलामी, डोमा प्रधान, मंसाराम मडावी व परिसरातील सर्व गावांचे पोलीस पाटील उपस्थित होते. मेळाव्यात प्रौंढांची कबड्डी स्पर्धा व व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आली. तसेच व्यसनमुक्तीवर आधारीत समाज प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. परिसरातील गरीब, गरजू कुटुंबांना पोलीस विभागाच्या वतीने स्वयंपाकाच्या भांड्यांचे वितरण करण्यात आले. मेळाव्यादरम्यान शासनाच्या विविध विभागामार्फत राबविल्या जाणाºया जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. संचालन मनोहर मडावी, प्रास्ताविक माजी सरपंच जगन मडावी तर आभार पोलीस पाटील हलामी यांनी मानले.२४ ला पोलीस पाटील दिनाचे आयोजनमहाराष्टÑ राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना तालुका शाखा कुरखेडा-कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा येथे बुधवार २४ जानेवारीला दुपारी १२ वाजता पोलीस पाटील दिन राजीव भवनात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, संघटनेचे विदर्भ अध्यक्ष भृंगराज परशुरामकर, तहसीलदार अजय चरडे, तहसीलदार पुष्ष्पा कुमरे, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, शरद ब्राह्मणवाडे, ठाणेदार योगेश घाडे, उमेश महाले, दीपक वारे, अतुल तवाडे, ढेकणे, मुरारी दहिकर, अनिल कोठारे उपस्थित राहणार आहेत.