जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्यसेवा सक्षम करा

By Admin | Updated: November 11, 2015 00:52 IST2015-11-11T00:52:32+5:302015-11-11T00:52:32+5:30

जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्यसेवा सक्षम करण्यावर भर देणे आवश्यक आहे, ...

Enable healthcare to increase livelihood | जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्यसेवा सक्षम करा

जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्यसेवा सक्षम करा

देवराव होळी यांचे प्रतिपादन : पोर्ला गावात नर्सिंग अभ्यासक्रम शिक्षणाची सोय उपलब्ध होणार
गडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आरोग्यसेवा सक्षम करण्यावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
तालुक्यातील पोर्ला येथे डॉ. साळवे हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोर्लाचे सरपंच कविता फरांडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, अविनाश भांडेकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष विलास दशमुखे, उपसरपंच नरेंद्र मामिडवार, डॉ. साळवे हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. प्रमोद साळवे, डॉ. अमित साळवे, डॉ. स्वप्नील साळवे, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र सालोटकर, रवींद्र सेलोटे, होमराज उपासे, रेखा डवरे, रोहिणी नरूले, विनोद दशमुखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुखरू चुधरी, डॉ. दयाराम झोडगे, डॉ. कुंदन वाघ, रमेश फरांडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गिरीधर भोयर, माजी सरपंच जीवन निकुरे, उपसरपंच बापू फरांडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती काशिनाथ फरांडे, भास्कर मेश्राम, बंडू बावणे, प्रभाकर आखाडे आदी उपस्थित होते.
पोर्ला परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन गडचिरोलीसारख्या मोठ्या शहराची निवड न करता पोर्ला येथे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. सदर उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे. अशा प्रकारचे हॉस्पिटल जिल्हाभरात उभे राहिल्यास आरोग्यसेवा सक्षम होण्यास फारमोठी मदत होईल, असा आशावाद विश्वास भोवते यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक डॉ. सप्नील साळवे तर आभार डॉ. प्रमोद साळवे यांनी मानले. यशस्वीतेसाठी आशिष नव्हाते, पूनित उपासे, मोरेश्वर कलसार, विकास लाडवे, रोशन करंडे, मोहिनी नवघडे उपस्थित होते.

Web Title: Enable healthcare to increase livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.