मुलीला सक्षम बनवा
By Admin | Updated: September 9, 2014 00:23 IST2014-09-09T00:23:07+5:302014-09-09T00:23:07+5:30
स्त्री ही पुरूषाच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नाही. हे आजपर्यंत महिलांनी प्राप्त केलेल्या कामगिरीवरून दिसून आले आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव चमकविले आहे. यासाठी मुलींना शिक्षण

मुलीला सक्षम बनवा
व्याख्यान : विनायक इरपाते यांचे प्रतिपादन
गडचिरोली : स्त्री ही पुरूषाच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नाही. हे आजपर्यंत महिलांनी प्राप्त केलेल्या कामगिरीवरून दिसून आले आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव चमकविले आहे. यासाठी मुलींना शिक्षण देऊन सक्षम करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले.
महिला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने स्त्री जीवनातील स्थित्यंतरे या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विनायक इरपाते यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा शालिनी मुनघाटे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नरेंद्र ्रमुनघाटे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या डॉ. हंसा तोमर, प्रा. डॉ. सुरेश खंगार उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. विनायक इरपाते पुढे म्हणाले की, पूर्वी स्त्रीवर बरीच बंधने लादण्यात आली होती. मुलींना शिक्षणाची दारे बंद बसल्याने त्यांची प्रगती ही थांबली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर मुलींच्या शिक्षणात कमालीची भर पडली आहे. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात मुली दिसून येतात. काही क्षेत्रात तर मुलींचीच आघाडी आहे, असे प्रतिपादन केले. त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय स्त्री व स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय स्त्री जीवनातील स्थित्यंतराचा उदाहरणासह आढावा घेतला.
प्रा. नरेंद्र आरेकर यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतीय स्त्रीयांच्या शोषणावर प्रकाश टाकतांना बाल - जरठ विवाह, केशवपन, सतीप्रथा या रूढींच्या नावाखाली स्त्रीयांची होणारी पिळवणूक उदाहरणाद्वारे विशद केली. शालिनी मुनघाटे यांनी अध्यक्षीय भाषनातून मुलींनी न्युनगंड बाळगू नये, जिद्द, परिश्रम, चिकाटीच्या बळावर यश संपादन करावे असे विचार मांडले.
संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. परिणीता घडूले यांनी तर आभार प्रा. अनिता लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. सातपुते, प्रा. गहेरवार, प्रा. बोधाने, प्रा. त्रिपाठी, प्रा. पाटील, प्रा. जम्बेवार, प्रा. देशपांडे, प्रा. मुळे, प्रा. शिंदे, प्रा. साळवे, प्रा. पारखी, प्रा. वैद्य, प्रा. तुमडे, प्रा. कुमरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)