ग्रामसभांचे सक्षमीकरण करा

By Admin | Updated: May 15, 2017 01:38 IST2017-05-15T01:38:13+5:302017-05-15T01:38:13+5:30

ग्रामसभेने स्वत: निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच पारदर्शकता ठेवून उत्पादक व उद्योजक यामध्ये थेट व्यवहार झाला पाहिजे.

Empower the Gramabhaas | ग्रामसभांचे सक्षमीकरण करा

ग्रामसभांचे सक्षमीकरण करा

धानोरात महासभा : विविध मुद्यांवर प्रतिनिधींनी केली चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : ग्रामसभेने स्वत: निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच पारदर्शकता ठेवून उत्पादक व उद्योजक यामध्ये थेट व्यवहार झाला पाहिजे. ग्रामसभांचे सक्षमीकरण करून प्रत्येक गावस्तरावर शासनाने गोदाम बांधण्यासाठी निधी द्यावा, यासह विविध मुद्यांवर धानोरा येथील दंतेश्वरी मंदिराच्या पटांगणावर रविवार पार पडलेल्या महासभेत चर्चा करण्यात आली.
इलाका भूमया गणेश मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महासभेदरम्यान शासनाने ग्रामसभा सक्षम करण्यासाठी गठित केलेल्या आदिवासी विकास विभागाच्या समितीचे अध्यक्ष व सदस्यही उपस्थित होते. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे सदस्य नीरज रासेकर, श्रीकांत बारहाते, प्रा. विनायकराव देशपांडे, प्रवीण मोटे, जयदीप हर्डीकर समितीतील आदी सदस्यांनी ग्रामसभेदरम्यान चर्चा केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, बाजीराव नरोटे, वासुदेव कुमोटी, अमित नरोटे, सुखदेव दुगा, प्रफुल किरंगे, सदुराम मडावी, माधव गोटा, दानचू तोफा, परसराम पदा, बाजीराव कुमोटी, राजीराम कोवे, देविदास पदा, जयंद्र आतला, मनोहर गुरनुले, मनोज जम्बेवार, कान्हू कोडाप, उसेंडी उपस्थित होते.
शासनाने इलाका व तालुका स्तरावरील ग्रामसभेचे सचिव म्हणून संबंधित पं. स. चे संवर्ग विकास अधिकारी व जिल्हास्तरावर मुख्य कार्यपालन अधिकारी सचिव म्हणून द्यावे, असे निवेदन राज्यपाल यांच्याकडे दिले असल्याची माहिती देवाजी तोफा यांनी अभ्यास समितीला दिली. या समितीने गोंदिया जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील ७० ते ८० ग्रामसभांना भेट देऊन चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभेमध्ये आत्मविश्वास असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. सदर प्रयोग देश पातळीवर प्रथम राबवित असल्याचेही सांगितले. यावेळी गावकरी उपस्थित होते.

Web Title: Empower the Gramabhaas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.