शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेकडो तेंदू मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

व्यंकटापूर ग्राम पंचायतीच्या वतीने तेंदू घटकाच्या लिलाव प्रक्रियेसाठी वृत्तपत्रात रितसर जाहिरात प्रकाशित करण्यात आली. पेसा अधिनियम व शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अनुसरून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. ग्राम पंचायतीचे प्रशासक जी. व्ही माकडे यांच्या अध्यक्षतेखाली कोष समितीचे सदस्य, साधन संपत्ती व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या लिलाव प्रक्रियेला दोन कंत्राटदारांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देग्रामसभेतर्फे हंगाम सुरू : व्यंकटापूर परिसरात संकलन अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्याच्या व्यंकटापूर परिसरात ग्रामसभांच्या वतीने लिलाव प्रक्रिया राबवून तेंदू संकलनाचे काम सुरू करण्यात आले असून हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सदर हंगामातून व्यंकटापूर येथील ४८ व परिसरातील शेकडो तेंदू मजुरांना रोजगार मिळाला आहे.व्यंकटापूर ग्राम पंचायतीच्या वतीने तेंदू घटकाच्या लिलाव प्रक्रियेसाठी वृत्तपत्रात रितसर जाहिरात प्रकाशित करण्यात आली. पेसा अधिनियम व शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अनुसरून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. ग्राम पंचायतीचे प्रशासक जी. व्ही माकडे यांच्या अध्यक्षतेखाली कोष समितीचे सदस्य, साधन संपत्ती व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या लिलाव प्रक्रियेला दोन कंत्राटदारांनी सहभाग घेतला. ९६२ गोणी तेंदूपत्त्याचे संकलन करण्यात येणार असून प्रति गोणी ४ हजार रूपये असा भाव एका कंत्राटदाराने बोलीत बोलला तर दुसऱ्या कंत्राटदाराने ५ हजार ६०० रूपयांची बोली लावली. नियमानुसार ५ हजार ६०० रूपये बोली बोलणाऱ्या कंत्राटदाराला हा कंत्राट देण्यात आला. प्रति पुडा ५ रूपये ६० पैशानुसार तेंदूपत्याचे संकलन सुरू आहे.फडीवर मजूर व हमालांना मास्क वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. फिजिकल डिस्टंन्सिंगचेही पालन केले जात असल्याची माहिती प्रशासक माकडे व सचिव रंजित राठोड यांनी दिली आहे. व्यंकटापूर, बामणी, ग्लासफोर्डपेठा, वेनलय्या आदी गावातही तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या नियंत्रणात तेंदू हंगाम सुरू आहे.संचारबंदीत आधारकोरोना संचारबंदीमुळे व्यंकटापूरसह सिरोंचा तालुक्यातील कामधंदे बंद असल्याने मजुरांचे हात रिकामे होते. ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने तेंदू संकलनाचे काम सुरू करण्यात आल्याने मजुरांना रोजगार प्राप्त होऊन दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Labourकामगार