बचत गटातून महिलांना रोजगार
By Admin | Updated: September 10, 2015 01:44 IST2015-09-10T01:44:35+5:302015-09-10T01:44:35+5:30
कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम झालेल्या महिला बचत गटांचे काम अतिशय उत्तम आहे. याच्या आधारे महिलांना रोजगार तर मिळाला ...

बचत गटातून महिलांना रोजगार
गडचिरोली : कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम झालेल्या महिला बचत गटांचे काम अतिशय उत्तम आहे. याच्या आधारे महिलांना रोजगार तर मिळाला सोबतच इतरांनाही रोजगार त्यांनी मिळवून दिला हे कौतुकास्पद कार्य आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत चार प्रकल्पांचे उद्घाटन मंगळवारी खा. नेते यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ-कोकण बँकेचे व्यवस्थापक डॉ.प्रशांत बेले हे होते. यावेळी आ. डॉ. देवराव होळी, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, वसंत फाऊंडेशनच वसंत उरकांदे, माविमच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, रवी ओल्लारवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. या साधन केंद्रातर्फे चालविण्यात येत असलेल्या अन्नपूर्णा माय खानावळच्या वार्षिक सभेचेही आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. महिला बचतगटांच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम सुरु करण्यात आलेले आहेत. यात गडचिरोलीच्या आसपास असणाऱ्या ११ गावांमधील महिलांनी एक बचतगट महासंघ स्थापन केला आहे. या महासंघातर्फे हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. साधन केंद्राच्या व्यवस्थापिका गीता गुड्डी आणि अन्नपूर्णा खानावळच्या अध्यक्ष ज्योती श्यामकुडे यांनी यावेळी बचत गटाच्या उपक्रमांची माहिती दिली. महिलांना नफ्यातून लाभांश आणि भेटवस्तूंचेही वाटप करण्यात आले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक पोटे, माविमचे घनोटे तसेच महिला बचत गटाच्या महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)