५८४ अपंगांना मिळाले रोजगार हमी योजनचे काम

By Admin | Updated: March 10, 2017 02:11 IST2017-03-10T02:11:46+5:302017-03-10T02:11:46+5:30

ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे.

Employment Guarantee Scheme for 584 disabled persons | ५८४ अपंगांना मिळाले रोजगार हमी योजनचे काम

५८४ अपंगांना मिळाले रोजगार हमी योजनचे काम

जनजागृतीची गरज : ग्रामीण भागातून मागणी कमी
गडचिरोली : ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अपंग नागरिकांना रोजगारासाठी विशेष प्राधान्य दिले जाते. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ५८४ अपंग मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतमजूर, अकुशल कामगार यांना बेकारीच्या कालावधीत रोजगार पुरविण्याचे काम केले जात आहे. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत रोहयो योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाजप सरकारने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अनेक योजना बंद केल्या. मात्र रोजगार हमी योजनेचे सकारात्मक परिणाम अजुनही दिसून येत असल्याने या योजनेत मात्र शासनाने कोणताही बदल न करता सदर योजना जशीच्या तशी सुरू ठेवली आहे.
२०१६-१७ या वर्षात सुमारे ५ हजार ९५२ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वाधिक १०० दिवसांचा रोजगार चामोर्शी तालुक्यातील १ हजार ३० कुटुंबांना उपलब्ध झाला आहे. चामोर्शी तालुक्याचा विस्तार मोठा आहे. त्या तुलनेने लहान असलेल्या धानोरा तालुक्यानेही १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात विशेष प्रगती केली आहे. धानोरा तालुक्यातील सुमारे ९४९ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे.
रोहयोमध्ये अपंग नागरिकांनाही विशेष प्राधान्य दिले जात असल्याने अपंगाने कामाची मागणी केल्यानंतर त्याला रोजगार उपलब्ध करून दिल्या जाते. वर्षभरात ५८४ अपंगांना रोजगार रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र एकूण रोजगाराच्या तुलनेत हे प्रमाण अगदी नगन्य असल्याचे दिसून येत आहे. अपंग मजूर पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नाही. रोहयोचे काम मिळते, याची माहिती अपंग मजुरांना नाही. परिणामी ते कामाची मागणी करीत नसल्याचे आजपर्यंत दिसून आले. याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Employment Guarantee Scheme for 584 disabled persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.