तेंदूपत्ता तोडणी कामातून रोजगार उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST2021-05-08T04:38:52+5:302021-05-08T04:38:52+5:30
कोरोना महामारीच्या संकटकाळात रिकाम्या हातांना काम नसल्याने मजुरांची ससेहोलपट चालली आहे. दरम्यान, वनविभागाने शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन तेंदू ...

तेंदूपत्ता तोडणी कामातून रोजगार उपलब्ध
कोरोना महामारीच्या संकटकाळात रिकाम्या हातांना काम नसल्याने मजुरांची ससेहोलपट चालली आहे. दरम्यान, वनविभागाने शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन तेंदू फळी सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पेसाअंतर्गत असलेल्या काही गावांत तेंदू फळी सुरू झाली असल्याने गावातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. साधारण दरवर्षीप्रमाणे यंदा मे महिन्यात तेंदूपत्ता संकलनाच्या कामास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत रिकाम्या हाताला कोणतेही काम नसते. तालुक्यातील तेंदूपत्ता संकलन फळी सुरू झाल्याने गावातील नागरिक पहाटेपासूनच तेंदूपाने गोळा करण्याच्या कामासाठी जात आहेत. काही नागरिक सायकल, दुचाकी वाहनाने तेंदूपाने भरलेले पोते घेऊन येत आहेत; तर काहीजण शिरवजा घेऊन पाने घरी आणून मुडके तयार करण्याचे काम गावात दिसून येत आहेत. हे काम करतानासुद्धा नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून मास्क लावून मुडके तयार करण्याचे काम करताना दिसून येत आहेत.