शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी घेणार भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ

By admin | Updated: October 20, 2014 23:13 IST

भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून

गडचिरोली : भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून यादरम्यान सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे शपथ देण्यात येणार आहे. मागील काही वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण देशात प्रचंड प्रमाणात वाढले. कर्मचारी यामुळे शासकीय कर्मचारी गब्बर बनले असले तरी जनतेच्या घामाचा पैसा जात असल्याने याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्येही जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यशासन २००१ पासून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहादरम्यान राज्य शासनाचे सर्व विभाग, त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग़्ाप्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगिकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमध्ये या सप्ताहाचे आयोजन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतची शपथ दिली जाणार आहे. शपथेचा नमूना राज्याचे राज्यपाल यांनी सूचित केल्याप्रमाणे राहणार आहे. सदर सप्ताह आयोजित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार नाही.मागील पाच वर्षात भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. चपराश्यापासून तर सचिवापर्यंतच्या दर्जाचे कर्मचारी भ्रष्टाचारात गडले आहेत. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आजपर्यंत अनेकांना शिक्षाही झाली आहे. मात्र हे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनसुद्धा चिंतेत पडला आहे. जनजागृती सप्ताहामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण होईल, अशी अपेक्षा सामान्य जनता करीत आहे. (नगर प्रतिनिधी)