कर्मचारी घेणार भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ
By Admin | Updated: October 20, 2014 23:13 IST2014-10-20T23:13:29+5:302014-10-20T23:13:29+5:30
भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून

कर्मचारी घेणार भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ
गडचिरोली : भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून यादरम्यान सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाचे शपथ देण्यात येणार आहे.
मागील काही वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण देशात प्रचंड प्रमाणात वाढले. कर्मचारी यामुळे शासकीय कर्मचारी गब्बर बनले असले तरी जनतेच्या घामाचा पैसा जात असल्याने याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्येही जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यशासन २००१ पासून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहादरम्यान राज्य शासनाचे सर्व विभाग, त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग़्ाप्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगिकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमध्ये या सप्ताहाचे आयोजन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतची शपथ दिली जाणार आहे. शपथेचा नमूना राज्याचे राज्यपाल यांनी सूचित केल्याप्रमाणे राहणार आहे. सदर सप्ताह आयोजित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार नाही.
मागील पाच वर्षात भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. चपराश्यापासून तर सचिवापर्यंतच्या दर्जाचे कर्मचारी भ्रष्टाचारात गडले आहेत. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आजपर्यंत अनेकांना शिक्षाही झाली आहे. मात्र हे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनसुद्धा चिंतेत पडला आहे.
जनजागृती सप्ताहामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण होईल, अशी अपेक्षा सामान्य जनता करीत आहे. (नगर प्रतिनिधी)