कर्मचाऱ्यांना अहिंसेची प्रतिज्ञा

By Admin | Updated: May 22, 2015 01:46 IST2015-05-22T01:46:27+5:302015-05-22T01:46:27+5:30

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिनानिमित्त त्यांना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या हस्ते आदरांजली अर्पण करण्यात आली.

Employees vow for non-violence | कर्मचाऱ्यांना अहिंसेची प्रतिज्ञा

कर्मचाऱ्यांना अहिंसेची प्रतिज्ञा

राजीव गांधींना आदरांजली : दहशतवादविरोधी दिन
गडचिरोली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिनानिमित्त त्यांना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या हस्ते आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना अहिंसा व सहिष्णुतेची शपथ देण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, देसाईगंजचे एसडीओ डी. जी. नान्हे, नियोजन अधिकारी भांगरे, तहसीलदार कुमरे, देशमुख, मुडे आदी उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांना अहिंसा व सहिष्णुतेविषयी निष्ठा बाळगुण दहशतवाद व हिंसाचाराचा मुकाबला करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतांश कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Employees vow for non-violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.