पेंशन वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे
By Admin | Updated: July 18, 2015 01:36 IST2015-07-18T01:36:48+5:302015-07-18T01:36:48+5:30
पूर्वीच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करून केलेली पेंशनची कमाई शासनाने २००५ ...

पेंशन वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे
मेळावा : सरकारी कर्मचारी संघटनेचे आवाहन
गडचिरोली : पूर्वीच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करून केलेली पेंशनची कमाई शासनाने २००५ पासून हिरावली असून अंशदायी पेंशन योजना सुरू केली. भविष्यात या योजनेत समस्या दिसून येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पेंशन वाचविण्यासाठी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटेनेचे राज्य सरचिटणीस सुनील जोशी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
स्थानिक जि. प. सभागृहात पेंशन बचाव मेळाव्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला संघटनेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रहास सुटे, सहसचिव पाटोळे, महाराष्ट्र राज्य जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, सुनील चडगुलवार, जिल्हासरचिटणीस वसंत सवरंगपते, जि. प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, दुधराम रोहणकर, संजय खोकले, माया बाळराजे, लतीफ पठाण, किशोर सोनटक्के हजर होते. (शहर प्रतिनिधी)