कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2016 01:46 IST2016-08-13T01:46:01+5:302016-08-13T01:46:01+5:30
राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी,

कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा
मुख्यमंत्र्यांकडे मागणी : संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
मुलचेरा : राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना तालुका शाखा मुलचेराच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे शिष्टमंडळाने मुलचेराच्या तहसीलदारांची गुरूवारी भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक बोरकुटे, उपाध्यक्ष रमेश साना, देवेंद्रकुमार पारधी, शिवाजी जाधव, हिरा दुंदलवार, के. एम. कटरे, ए. एन. अधिकारी, अरूण सिडाम आदींसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या पेंशन प्रश्नावर शासनाकडून कार्यवाही होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांचे थोडेफार योगदान आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ अन्वये जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)