दस्तावेजाच्या पसाऱ्यात कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या !
By Admin | Updated: March 4, 2015 02:03 IST2015-03-04T02:03:14+5:302015-03-04T02:03:14+5:30
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्यात आली.

दस्तावेजाच्या पसाऱ्यात कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या !
जि.प. इमारतीतील विदारक वास्तव
जागेवरून कर्मचाऱ्यांमध्ये होते शाब्दिक चकमक
जुन्या इमारतीच्या विस्ताराची गरज
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्यात आली. त्यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या कमी होती व शासनाच्या योजनाही मर्यादित प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची इमारत पुरेशी होती. मात्र मागील आठ वर्षांपासून शासनाने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी व नियमित कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मात्र जिल्हा परिषदेची इमारत आहे तेवढीच आहे. नवीन कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबरोबरच जुने व नवीन दस्तावेज ठेवावे लागत आहे. दिवसेंदिवस दस्तावेजाचे गठ्ठे वाढत चालले आहेत. आलमाऱ्या पूर्णपणे भरल्याने गठ्ठे बाहेरच ठेवावे लागत आहेत. या गठ्ठ्यांच्या गर्दीत कर्मचाऱ्यांना स्वत:चे टेबल व खुर्च्या ठेवण्यासाठीही जागा मिळणे कठीण झाले आहे.
एका खोलीत दोन ते तीन विभागाचे कर्मचाऱ्यांना राहावे लागत आहे. अधिकारी वर्गाचे कक्षही वाटून घेतले जात आहे. बऱ्याचवेळा खुर्ची व टेबल लावण्यावरून, दस्तावेजाचे गठ्ठे काढण्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमकही उडत आहे. त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले असून इमारतीचे विस्तारीकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
एकाच संगणकावर पाचपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा भार
जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या तुलनेत संगणकाची संख्या अत्यंत कमी आहे. प्रत्येक विभागात फक्त दोन ते तीन संगणक आढळून येतात. त्यामुळे एकाच संगणकावर पाच पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. मंत्रालयातून तत्काळ माहिती मागितल्यानंतर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते.
दिगांबर जवादे ल्ल गडचिरोली
वाढत्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेची इमारत अपुरी पडत आहे. दस्तावेज ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली नसल्याने संबंधित विभागातच दस्तावेजाचे गठ्ठे ठेवले जात आहेत. त्यामुळे बसण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. ही अडचण लक्षात घेता इमारतीचे विस्तारीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ंजिल्हा परिषदेतील दस्तावेजाची अडचण अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्याही लक्षात आली आहे. कृषी विभागाचे गोदाम दस्तावेज ठेवण्यासाठी वापरले जाणार आहे. सदर गोदाम त्यासाठी लवकरच तयार केले जाणार आहे. गोदाम उपलब्ध झाल्यानंतर दस्तावेजाची समस्या मिटेल.
- शामराव कुंभार, अभियंता, बांधकाम विभाग, जि.प. गडचिरोली