श्रमदानातून वृक्षारोपण व फळझाडे लावण्यावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST2021-07-22T04:23:19+5:302021-07-22T04:23:19+5:30

पावसाळ्याचे औचित्य साधून गडचिरोली येथील वनसंरक्षक तसेच उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन वनसंरक्षक कार्यालयाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत श्रमदानातून ...

Emphasize planting trees and fruit trees through hard work | श्रमदानातून वृक्षारोपण व फळझाडे लावण्यावर भर द्या

श्रमदानातून वृक्षारोपण व फळझाडे लावण्यावर भर द्या

पावसाळ्याचे औचित्य साधून गडचिरोली येथील वनसंरक्षक तसेच उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन वनसंरक्षक कार्यालयाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत श्रमदानातून फळझाडांची लागवड केली आहे. यावेळी मुख्य संरक्षक बाेलत हाेते. पशु पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर उरलेली फळे वसाहतीतील कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळतील. आपण फक्त वृक्षारोपण करून थांबायचे नाही तर लावलेल्या रोपट्यांचे मोठे वृक्ष कसे होतील यासाठी जोपासना करावी लागेल असे ते म्हणाले.

लागवड केलेल्या रोपांमध्ये प्रामुख्याने आंबा, सिताफळ, बोर, चिंच ह्या प्रजातींचा समावेश आहे. वृक्ष लागवडीसोबत याच परिसरात वाढलेल्या भुतंगांजा (रानतुळस) या उपद्रवी तणांचेसुद्धा निर्मूलन सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून यानिमित्ताने केले. श्रमदानातून फळझाडांची लागवड करण्याच्या उपक्रमात उपवनसंरक्षक कुमार स्वामी, सहायक उपवनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज ढेेंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे, वनपाल प्रमोद जेनेकर, अरूप कन्नमवार, फाये, चंदू बावनवाड़े, नितेश सोमलकर, महेंद्र गावंडे, भरत अल्लीवार, किशोर सोनटक्के, उमेश बोरावार, धम्मराव दुर्गंवार, सिद्धार्थ मेश्राम, राजू कोडाप, ताराचंद म्हशाखेत्री, अजय जवडे, अजय कुकडकर, दिवाकर वडसकर, रवि बनसोड आदींनी सहभाग घेतला. यावेळी श्रमदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तम प्रजातीच्या शेवगा व केळीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Emphasize planting trees and fruit trees through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.