नातवाला वाचविताना आजाेबांना लागला कुलरचा शाॅक; दोघेही जखमी
By गेापाल लाजुरकर | Updated: July 23, 2023 19:28 IST2023-07-23T19:28:13+5:302023-07-23T19:28:34+5:30
काेलपल्लीतील घटना : कपडे वाळविताना घडली घटना

नातवाला वाचविताना आजाेबांना लागला कुलरचा शाॅक; दोघेही जखमी
गडचिराेली : ओले कपडे कुलरजवळ वाळविताना नातवाला विजेचा शाॅक लागला. ताे ओरडत असताना आजाेबाने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दाेघांनाही जाेरदार शाॅक लागला व ते दाेघेही जखमी झाले. ही घटना मुलचेरा तालुक्याच्या काेलपल्ली येथे रविवार २३ जुलै राेजी घडली.
सागर देवराव आत्राम व भाऊराव पत्रुजी सिडाम असे जखमी झालेला नातू व आजाेबाचे नाव आहे. सागर आत्राम हा कुलरजळ कपळे वाळवायला गेला. कपडे वाळवण्यासाठी टाकत असतानाच त्याच्या हाताचा स्पर्श कुलरच्या सर्विस वायरला झाला. शाॅक लागताच सागर ओरडला, तेव्हा आजाेबा भाऊराव यांनी त्याला हातानेच ओढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दाेघेही खाली काेसळले. दाेघांनाही सुरूवातीला लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्यानंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.
सदर घटनेची माहिती मिळताच जि.प.चे माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृउबासचे सभापती अजय कंकडालवार यांनी रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली व डाॅक्टरांनासुद्धा याेग्य उपचार करण्याची विनंती केली. यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, बुधाजी सिडाम, कुमार गुरनुले, राकेश सडमेक उपस्थित होते.