शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 01:56 IST2017-03-15T01:56:00+5:302017-03-15T01:56:00+5:30

निवडणूक जाहीरनाम्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी,

Emancipation of farmers! | शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा!

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा!

धरणे आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन
गडचिरोली : निवडणूक जाहीरनाम्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक, ५० टक्के नफा एवढा हमीभाव देण्यात यावा, यासाठी जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे, भारनियमन बंद करा, कृषिपंपांना वीज जोडणी द्या, प्रलंबित दावे निकाली काढा आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना अध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, शालिक नाकाडे, घिसू खुणे, रामचंद्र रोकडे, रामभाऊ मोटवानी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Emancipation of farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.