योजनेच्या लाभातून दारिद्र्य निर्मूलन शक्य
By Admin | Updated: June 29, 2017 02:09 IST2017-06-29T02:09:57+5:302017-06-29T02:09:57+5:30
राज्य व केंद्र शासनाने सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी कार्यान्वित केलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या

योजनेच्या लाभातून दारिद्र्य निर्मूलन शक्य
एस. टी. सूर यांचे प्रतिपादन : दारिद्र्य हटविण्याबाबत कायदेविषयक शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य व केंद्र शासनाने सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी कार्यान्वित केलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन शक्य आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त न्यायाधीश एस. टी. सूर यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने बुधवारी येथील न्याय सेवा सदनात ‘दारिद्र्य हटविण्याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या योजना २०१५’ या विषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर मुख्य न्याय दंडाधिकारी एम. व्ही. पाटील, दिवाणी न्यायाधीश एन. पी. वासाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाबरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रकल्प संचालक बाबरे यांनी बतगटांना अर्थसहाय्य, घरकूल योजना, बेरोजगार युवकांसाठी असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. रोजगार हमीतून रोजगार उपलब्ध होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन न्यायालयाचे कनिष्ठ लिपीक व्ही. व्ही. वाळके यांनी केले तर आभार अ. दे. गुरनुले यांनी मानले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.