शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

अकराशे लोकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:21 PM

वनविकास महामंडळाच्या वतीने जिमलगट्टा येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले. या शिबिरात सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने १ हजार १४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला.

ठळक मुद्देजिमलगट्टा येथे एफडीसीएमतर्फे शिबिर : २५३ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : वनविकास महामंडळाच्या वतीने जिमलगट्टा येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले. या शिबिरात सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने १ हजार १४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला.आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या उपचारासाठी महागड्या शहरात जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन वनविकास महामंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. जिमलगट्टा परिसरातील अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. वनविकास महामंडळाच्या सीएसआर या निधीतून सदर आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली. या निधीतूनच शिबिराचा खर्च केला जाणार आहे. या शिबिराला दक्षिण चंद्रपूरचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, आलापल्लीचे उपवनसंरक्षक तूषार चव्हाण, जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, त्वचारोग तज्ज्ञ आदर्शलता सिंग, एफडीसीएमचे सहायक व्यवस्थापक एस.जी.सिंपले, नंदनवार, उईके, रामटेके, डॉ.सिंगोटे उपस्थित होते. शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांनी शिबिराच्या आयोजना उद्देश सांगितला. त्यानंतर परिसरातील १ हजार १४२ नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी २५३ रुग्णांना सावंगी येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. पाच लाख रूपयांपर्यंतचा खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया सावंगी येथील रुग्णालयात एफडीसीएमच्या पुढाकाराने नि:शुल्क केल्या जातील. रुग्णांना ने-आण करण्याची व्यवस्थाही केली जाईल, असे अधिकाºयांनी सांगितले. शिबिराला परिसरातील ५० गावातील नागरिक उपस्थित होते. आभार एस.फुलझेले यांनी मानले. यशस्वीतेसाठी डीएफओ एस.आर.पाटील व एफडीसीएमच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.

टॅग्स :Healthआरोग्य