आमदारांच्या विरोधात तलाठ्यांचा एल्गार
By Admin | Updated: June 7, 2016 07:39 IST2016-06-07T07:39:53+5:302016-06-07T07:39:53+5:30
गडचिरोलीचे आमदार डॉ देवराव होळी यांनी २ जून ला गडचिरोलीचे तलाठी अजय तुंकलवार यांना गडचिरोली लगत

आमदारांच्या विरोधात तलाठ्यांचा एल्गार
अहेरी : गडचिरोलीचे आमदार डॉ देवराव होळी यांनी २ जून ला गडचिरोलीचे तलाठी अजय तुंकलवार यांना गडचिरोली लगत असलेल्या कठानी नदीच्या घाटावर शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. या विरोधात अजय तुंकलवार यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल केली. मात्र अद्यापही डॉ. देवराव होळी यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या विरोधात विदर्भ पटवारी संघ नागपूर तालुका शाखा अहेरी वतीने पटवाऱ्यांचे लेखनी बंद आंदोलन सोमवारपासून सुरु करण्यात आले.
यावेळी अहेरीचे तहसीलदार एस.एन. सिलमवार यांना पटवारी संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विदर्भ पटवारी संघाचे गडचिरोली जिल्हा शाखेचे सचिव एकनाथ चांदेकर,अहेरी उपविभागाचे सचिव वेंकटेश जल्लेवार, तालुका सचिव अविनाश कोडापे, तलाठी इब्राहिम शेख, राजेन्द्र आव्हाड, जनार्धन अन्नलदेवार, विनोद कावटी, फिरोज मडावी आदीसह तालुक्यातील तलाठी उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)