विदर्भवाद्यांकडून वीजबिलाची होळी

By Admin | Updated: August 10, 2015 00:53 IST2015-08-10T00:53:22+5:302015-08-10T00:53:22+5:30

विजेचे वाढलेले दर कमी करावे व स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, नवीन कोळसा आधारीत वीज प्रकल्प रद्द करावे, ...

Electricity bill of Vidarbhais | विदर्भवाद्यांकडून वीजबिलाची होळी

विदर्भवाद्यांकडून वीजबिलाची होळी

नारेबाजीही केली : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची घेतली शपथ
गडचिरोली : विजेचे वाढलेले दर कमी करावे व स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, नवीन कोळसा आधारीत वीज प्रकल्प रद्द करावे, या मागणीसाठी रविवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात वीज बिलाची होळी करुन जोरदार नारेबाजी केली.
या आंदोलनात अरुण मुनघाटे, रोहिदास राऊत, राजेंद्रसिंह ठाकूर, शालिक नाकाडे, रमेश भुरसे, नामदेवराव गडपल्लीवार, शरद ब्राह्मणवाडे, विवेक चडगुलवार, पांडुरंग घोटेकर, गोविंदराव बानबले, प्रतिभा चौधरी, जीवन गोडे, बापू करणे, भास्कर कोठारे, पंकज गुड्डेवार, महेंद्र ब्राह्मणवाडे, संजय घोटेकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करुन विदर्भ राज्य निर्मितीची शपथ घेतली. त्यानंतर वीजबिलाची होळी केली. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही. शासनकर्त्यांचे विदर्भाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी नारेबाजी केली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Electricity bill of Vidarbhais