कोडीगाव येथे वीज पडून महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 01:22 IST2017-06-25T01:22:42+5:302017-06-25T01:22:42+5:30

वीज पडून महिला जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील कोडीगाव टोला येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

Electricity and electricity kills women in Kodigao | कोडीगाव येथे वीज पडून महिला ठार

कोडीगाव येथे वीज पडून महिला ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : वीज पडून महिला जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील कोडीगाव टोला येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. ललीता भाऊजी मोहुर्ले (३०) रा. कोडीगाव असे मृतक महिलेचे नाव आहे.
ललीता मोहुर्ले ही शेतात काम करायला गेली होती. तेथून परत येत असताना अचानक पाऊस सुरू झाला व घरापासून काही अंतरावर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मुलचेरा तालुक्यातील धनुर येथेही अशी घटना घडली होती. या तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.
सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, माजी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, नगरसेवक श्रीनिवास चटारे, श्रीनिवास विरगोनवार, वेलगूर ग्रा. पं. चे सदस्य आदील पठाण, अब्दुल हुसैन यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डॉ. संजय उमाटे यांनी शवविच्छेदन केले.

 

Web Title: Electricity and electricity kills women in Kodigao