विद्युत अभियंत्यांनी कुटुंबासह गरजूंना केले भाेजनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:14+5:302021-06-05T04:26:14+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना व गरजूंना युवक काॅंग्रेसच्या वतीने दुपारी व रात्री भोजन तसेच दुपारी ३ ते ...

विद्युत अभियंत्यांनी कुटुंबासह गरजूंना केले भाेजनदान
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना व गरजूंना युवक काॅंग्रेसच्या वतीने दुपारी व रात्री भोजन तसेच दुपारी ३ ते ४ वाजतादरम्यान चहा, बिस्किटे वितरित केली जात आहेत. दीड महिन्यापासून हा उपक्रम सुरू आहे. त्यांच्या कार्याला आपलाही हातभार लागावा म्हणून मागील महिन्यात वीज अभियंत्यांनी आर्थिक सहकार्य केले हाेते. त्यानंतर आता लाॅकडाऊन कालावधी १५ जूनपर्यंत वाढल्यामुळे भोजनदानाचा उपक्रम युवक काॅंग्रेसतर्फे पुन्हा अविरत सुरू ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला आहे. भाेजनदानाच्या उपक्रमात महावितरण कंपनी कार्यालय गडचिरोली येथील विद्युत अभियंता स्वप्निल राणे, विशाल जयस्वाल, पुनेश्वर मेश्राम, प्रफुल पिंपळकर, नेहा पुट्टावार, प्रियंका वंजारी यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनीकांत मोटघरे, गौरव येनप्रेड्डीवार, संजय चन्ने, तोफिक शेख, रवी गराडे, कुणाल ताजणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
040621\04gad_1_04062021_30.jpg
===Caption===
भाेजनदान करताना विद्युत अभियंते, साेबत युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी.