वीज धक्क्याने कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: October 5, 2015 01:45 IST2015-10-05T01:45:31+5:302015-10-05T01:45:31+5:30
चामोर्शी नगर पंचायतीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या तांत्रिक कामगाराचा विद्युत खांबावर चढून काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.

वीज धक्क्याने कामगाराचा मृत्यू
चामोर्शीतील घटना : विजेच्या लंपडावाने केला घात
चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या तांत्रिक कामगाराचा विद्युत खांबावर चढून काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.
आशिष प्रेमानंद लाकडे (२५) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार चामोर्शी शहरातील गोंड मोहल्ल्यातील पथदिवे बंद असल्याच्या तक्रारीवरून आशिष लाकडे याला तेथील बल्ब लावण्यासाठी येथील विद्युत विभागाच्या प्रभारीने पाठविले. त्यानुसार आशिषने सुरू असलेला विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी ग्रिप काढला. नेमक्या याचवेळी नेहमीप्रमाणे विद्युत पुरवठा खंडीत झाला.
विद्युत पुरवठा बंद झाल्याचे समजून आशिषने तारांना हात लावला. खंडीत विद्युत पुरवठा लगेच सुरू झाला. त्यामुळे वीज धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विजेच्या लपंडावाने आशिष घात झाला. सहअभियंता सचिन रणदिवे याच्या तक्रारीनुसार चामोर्शी पोलिसांनी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार गणेश लोणारकर करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)