कॉलेजच्या कट्ट्यावरही निवडणुकीच्या चर्चा

By Admin | Updated: October 11, 2014 01:41 IST2014-10-11T01:41:00+5:302014-10-11T01:41:00+5:30

तरूण मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीपासून प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या क ट्ट्यावरही सध्या प्रथम सत्र परीक्षेच्या काळात निवडणुकीच्या चर्चा रंगत आहे.

Elections in college clippings | कॉलेजच्या कट्ट्यावरही निवडणुकीच्या चर्चा

कॉलेजच्या कट्ट्यावरही निवडणुकीच्या चर्चा

गडचिरोली : तरूण मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीपासून प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या क ट्ट्यावरही सध्या प्रथम सत्र परीक्षेच्या काळात निवडणुकीच्या चर्चा रंगत आहे.
महाविद्यालयीन निवडणुका महाराष्ट्रात बंद झाल्या असल्या तरी विद्यापीठ परिषदेची निवडणूक मात्र आता वेगळ्या पध्दतीने घेतली जात आहे. त्यामुळे तरूणांना निवडणुकीच्या रणधुमाळीपासून दूर जावे लागले आहे. मात्र सध्या महाविद्यालयांमध्ये विधानसभा निवडणुकीची चर्चा झडत आहे. सकाळी ७.३० वाजता महाविद्यालयात पहिला तास सुरू होतो. मग ते महिला महाविद्यालय असो किंवा मुलामुलींचे वरिष्ठ महाविद्यालय असो, सध्या निवडणुकीचा ज्वर येथेही तापलेला दिसत आहे. यावेळी मतदार निश्चितपणे करायचे, असो दृढ निश्चय या तरूण मतदारांनी केलेला आहे. आपल्या विधानसभा मतदार संघात कोण कोणत्या पक्षाकडून उभा आहे. हे अनेकांना माहित नाही. मात्र त्यांना राष्ट्रीय स्तरावरचे नेते व त्यांच्या पक्षाचे चिन्ह माहित आहे. त्यामुळे त्यांना मतदान करायचे, असा या तरूण मतदारांचा निश्चय आहे. मग ओघानेच अमेरिकेच्या गार्डनमध्ये गाजलेले मोदीचे भाषण, कुठे पळाले अच्छे दिन, महाराष्ट्राच्या सरकारचा पारदर्शक कारभार, राज्यात झालेला सिंचन घोटाळा आदीच्या चर्चाही तरूण मतदार कॉलेज कट्ट्यावर करताना दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्याने गैरआदिवासींची केलेली कुंचबना याही बाबीवर तरूण मतदार भाष्य करताना आढळून येतो. मात्र राष्ट्रीय प्रतिमा ही त्याच्या समोर आहे. देशहितासाठी यांना एकदा संधी द्यायला काय हरकत, असाही प्रतिप्रश्न ते उपस्थित करीत आहे. तरूणाचा उत्साह पाहू जाता मतदानाची टक्केवारी वाढण्याची चिन्ह आहे. सध्या कॉलेज कट्टा निवडणुकीच्या चर्चेने रंगलेला आहे. दिवसभर या चर्चा सुरूच आहे. गावात कोण आघाडी घेऊन आहे. याचा अंदाज कॉलेजच्या तरूणांकडून घेतला तर राजकीय पक्षालाही आपला उमेदवार किती पाण्यात आहे. याचा अंदाज येऊन जाईल. अनेक महाविद्यालयांचे प्राध्यापक सध्या प्रचारात व्यस्त आहे. जिल्हाभराचा आढावा घेतला तर प्रत्येक मतदार संघात लोकसभेच्या मोदीलाटेचा परिणाम तरूण मतदारावर प्रकर्षाने कायम असल्याचे दिसून येते. हे चित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी मोबाईलवरून संदेश देणारा प्रचारही सुरू केला आहे. अनेक तरूणांना दररोज या संदर्भातील कॉल येत आहे. त्यामुळे या मोबाईल प्रचाराचे ज्वरही तरूण वर्गात वाढत आहे. अनेक जणांना व्हॉट्अपस्वरही प्रचाराच्या अनेक फिती पाठविल्या जात आहे. त्यामुळे तरूण मतदार सध्या फोर्समध्ये आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Elections in college clippings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.