१६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वारे गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:02+5:30

देसाईगंज हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात देसाईगंज नगर परिषद वगळता सर्वच ठिकाणी ग्रामपंचायतीचे प्रशासन आहे. मात्र गावे सधन असल्याने या तालुक्यातील प्रत्येक निवडणूक नेटाने लढविली जाते. राजकीय पक्षही आपले उमेदवार उभे करून जोर लावतात. देसाईगंज तालुक्यात एकूण १९ ग्रामपंचायतींपैकी १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Election winds are hot in 16 Gram Panchayats | १६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वारे गरम

१६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वारे गरम

ठळक मुद्देगावांमध्ये मोर्चेबांधणी : आजपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार

पुरूषोत्तम भागडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : निवडणूक विभागाने देसाईगंज तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे गावातील वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या १६ ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १६१ उमेदवार निवडले जाणार आहेत.
देसाईगंज हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात देसाईगंज नगर परिषद वगळता सर्वच ठिकाणी ग्रामपंचायतीचे प्रशासन आहे. मात्र गावे सधन असल्याने या तालुक्यातील प्रत्येक निवडणूक नेटाने लढविली जाते. राजकीय पक्षही आपले उमेदवार उभे करून जोर लावतात. देसाईगंज तालुक्यात एकूण १९ ग्रामपंचायतींपैकी १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या १६ ग्रामपंचायतींमधून १६१ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. ६ मार्चपासून नामनिर्देशनपत्र भरण्याला सुरूवात होणार असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित करण्यास सुरूवात केली आहे. स्थानिक निवडणूक असल्याने पक्षापेक्षा उमेदवार महत्त्वाचा असल्याने काही नागरिक स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. निवडणूक कालावधी जसजसा जवळ येत आहे, तसतसा ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे शेतीचा हंगाम आता संपला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला थोडी उसंत असल्याने निवडणुकीकडे विशेष लक्ष घातले जात आहे.

ग्रा.पं.निहाय सदस्य संख्या
तालुक्यातील कुरूड ग्रा.पं.तून १३ सदस्य निवडले जाणार आहेत. कोंढाळा ग्रा.पं.मधून ११, कसारी ७, बोडधा ११, एकलपूर ७, चोप ११, शंकरपूर ९, विहीरगाव ७, आमगाव ११, तुळशी ९, शिवराजपूर ९, पिंपळगाव ९, विसोरा ११, पोटगाव ९, डोंगरगाव ९, किन्हाळा ९, कोकडी ग्रा.पं.मधून ९ असे एकूण १६ ग्रामपंचायतीमधून १६१ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत.

Web Title: Election winds are hot in 16 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.