निवडणुकीतील विजयाचा जिल्हाभर सर्वत्र जल्लोष

By Admin | Updated: February 24, 2017 00:52 IST2017-02-24T00:52:59+5:302017-02-24T00:52:59+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सिरोंचा तालुक्याच्या विठ्ठलरावपेठा-जाफ्राबाद जि.प. क्षेत्रातून जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम विजयी झाल्या.

Election victory in the district is everywhere | निवडणुकीतील विजयाचा जिल्हाभर सर्वत्र जल्लोष

निवडणुकीतील विजयाचा जिल्हाभर सर्वत्र जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सिरोंचा तालुक्याच्या विठ्ठलरावपेठा-जाफ्राबाद जि.प. क्षेत्रातून जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम विजयी झाल्या. त्यानंतर विजय भावमुद्रेत त्यांच्या सासू संयोगीता हलगेकर व हलगेकर परिवारांच्या सदस्यांसोबत आनंद साजरा करीत होत्या. तसेच आरमोरी तालुक्याच्या पळसगाव-अरसोडा जि.प. गणातून काँग्रेसच्या मनिषा दोनाडकर विजयी झाल्या. शिवसेनेचा बालेकिल्ला अनेक वर्षानंतर त्यांनी उद्ध्वस्त केला. त्यामुळे येथे सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. एटापल्ली तालुक्याच्या परसलगोंदी-गट्टा जि.प. गणातून सैनू मासू गोटा जि.प.वर तर त्यांच्या पत्नी पंचायत समितीवर विजयी झाल्या. त्यांनीही कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष एटापल्ली येथे साजरा केला.

Web Title: Election victory in the district is everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.