कोकडी ग्रा.पं.ची निवडणूक ठरली चुरशीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST2021-02-17T04:44:25+5:302021-02-17T04:44:25+5:30
काेकडी येथील सरपंचपद नामाप्र (सर्वसाधारण) साठी राखीव होते. सरपंच पदासाठी केवळराम सीताराम टिकले व लक्ष्मी टिकले ...

कोकडी ग्रा.पं.ची निवडणूक ठरली चुरशीची
काेकडी येथील सरपंचपद नामाप्र (सर्वसाधारण) साठी राखीव होते. सरपंच पदासाठी केवळराम सीताराम टिकले व लक्ष्मी टिकले यांनी तर उपसरपंच पदासाठी पुष्पलता योगाजी खोब्रागडे व अंगराज श्रीराम बुद्धे यांनी नामांकन सादर केले होते. अर्ज कुणीही मागे न घेतल्याने शेवटी मतदान झाले. गुप्त मतदानात सरपंच पदासाठी केवळराम टिकले यांना ५ मते तर लक्ष्मी टिकले यांना ४ मते मिळाली. उपसरपंच पदासाठी पुष्पलता खोब्रागडे यांना ५ मते तर अंगराज बुद्धे यांना ४ मते मिळाली. त्यामुळे सरपंच पदावर केवळराम टिकले तर उपसरपंच पदावर पुष्पलता खाेब्रागडे यांची वर्णी लागली. अध्याशी अधिकारी म्हणून मंडल अधिकारी के. आर. कावळे यांनी काम पाहिले. तर ग्रामसेविका एस.के.टेंभुर्णे यांनी सहकार्य केले.