आरमोरी नगर परिषदेची निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:48 IST2018-12-27T22:48:15+5:302018-12-27T22:48:27+5:30

बहुप्रतिक्षीत आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २८ ला मतमोजणी होणार आाहे.

Election of Aromari Nagar Parishad | आरमोरी नगर परिषदेची निवडणूक जाहीर

आरमोरी नगर परिषदेची निवडणूक जाहीर

ठळक मुद्दे२७ जानेवारीला मतदान : २ पासून नामनिर्देशन पत्र स्वीकारतील

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : बहुप्रतिक्षीत आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २८ ला मतमोजणी होणार आाहे.
२ ते ९ जानेवारी या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर नामनिर्देशन पत्र उपलब्ध होतील. याच कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. १० जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाणनी करून वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. १७ जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. २७ जानेवारी रोजी रविवारी मतदान होईल. २८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

Web Title: Election of Aromari Nagar Parishad